छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'देवमाणूस'(devmanus). या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यामुळे या मालिकेच्या पहिल्या भागाने निरोप घेतल्यावर प्रेक्षकांमध्ये प्रचंड नाराजी उमटली होती. विशेष म्हणजे प्रेक्षकांकडून मिळत असलेलं प्रेम आणि लोकप्रियता पाहता अलिकडेच या मालिकेचा दुसरा भाग 'देवमाणूस 2' प्रेक्षकांच्या भेटीला आला. या नव्या भागात जुन्या कलाकारांसोबतच काही नवे चेहरेदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. मात्र, जुने कलाकार पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष त्यांच्याकडे वेधून घेत आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे बाबू. उत्तम अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या बाबूने खऱ्या आयुष्यात प्रचंड हालाखीचे दिवस काढले आहेत. 'देवमाणूस' या मालिकेतील डॉ. अजित कुमार देव, एसीपी दिव्या सिंह, बजा, डिंपल, सुरु आजी या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या सगळ्यामध्ये डिंपलच्या वडिलांनी म्हणजेच बाबूने त्याच्या हटके अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा वेधून घेतल्या. या मालिकेत बाबू ही भूमिका अभिनेता अकुंश मांडेकर (ankush mandekar) यांनी साकारली आहे. 'देवमाणूस'मुळे लोकप्रिय झालेले अंकुश यांनी खऱ्या आयुष्यात अनेक खस्ता खालल्या आहेत.
'अरुंधती' आणि 'डॉ. अजितकुमार'चं आहे खास नातं; दोघांमधील 'हे' कनेक्शन ऐकल्यावर व्हाल आश्चर्यचकित
बी कॉमपर्यंत अंकुश मांडेकर यांचं शिक्षण झालं असून एकेकाळी त्यांनी भारुडांमध्येही काम केलं आहे. अंकुश मांडेकर लहान असतांना भारुडांमध्ये काम करायचे. त्यामुळे तेव्हापासूनच त्यांच्यात अभिनयाचे गुण रुजले होते. विशेष म्हणजे बीकॉम झाल्यानंतर ते पुण्यात नोकरीसाठी आले होते. मात्र, त्यांच्यातील अभिनय त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. अखेर त्यांनी नोकरीचा नाद सोडून कलाविश्वाची वाट धरली.
दरम्यान, अंकुश यांनी योगेश सोमण यांच्या सावरकरांची जन्मठेप या नाटकातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर सुरेश पाटोळे यांच्या मला जगायचंय या चित्रपटातून ते रुपेरी पडद्यावर झळकले. त्यानंतर झेंडा, स्वाभिमान, लादेन आला रे आला या सारख्या चित्रपटात त्यांनी काम केलं आहे.