Join us

‘देवमाणूस 2’ मालिकेतील कलाकारांची खरी नावं तुम्हाला ठाऊक आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2022 8:00 AM

Devmanus Season 2 :  ‘देवमाणूस’ ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. आता या मालिकेचा दुसरा भाग अर्थात ‘देवमाणूस 2’ प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

छोट्या पडद्यावर एका मराठी मालिकेनं नुसता धुमाकूळ घातला होता. प्रतिसाद इतका की, मेकर्सनी लगेच मालिकेचा दुसरा भाग आणला. होय, आम्ही बोलतोय ते ‘देवमाणूस’ या मालिकेबद्दल.  ‘देवमाणूस’ ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. आता या मालिकेचा दुसरा भाग अर्थात ‘देवमाणूस 2’ (Devmanus 2) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे आणि हा दुसरा सीझनही तुफान लोकप्रिय झाला आहे. ‘देव माणूस’ म्हणजेच अजित कुमार हा नटवर सिंग हे बनावट नाव धारण करून गावात सध्या वावरत आहे. मालिकेमध्ये पुढे काय होणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत मात्र हळूहळू कथानक आता सुरू होत आहे. तूर्तास या मालिकेतील पात्रांची खरी नावं आणि त्यांचं मानधन आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

* ‘देवमाणूस 2’मध्ये नटवर सिंग म्हणून वावरत असलेल्या पात्राचं खरं नाव किरण गायकवाड आहे. किरणने यात  देव माणूस म्हणजेच अजितकुमार देवची भूमिका साकारली आहे. रिपोर्टनुसार, किरण गायकवाड हा एका भागासाठी तब्बल 35 हजार रुपये मानधन घेतो. 

* ‘देवमाणूस’मध्ये डिंपल होती. ‘देवमाणूस 2’मध्येही ती आहे. तिचं खरं नाव अस्मिता देशमुख. ती एका भागासाठी तब्बल 22 हजार रुपये आकारते.  

* ‘देवमाणूस’ हा मालिका हिट झाल्यानंतर या मालिकेतील सरू आजीही चांगलीच हिट झाली होती. दुसऱ्या सीझनमध्येही सरू आजी आहे. रुक्मिणी सुतार यांनी ही भूमिका साकारली आहे.  रुक्मिणी सुतार एका भागासाठी 13 हजार रुपये घेतात. त्या 71 वर्षांच्या आहेत.

* मालिकेत मंगलची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं खरं नाव काय, तुम्हाला ठाऊक आहे? तर तिचं नाव अंजली जोगळेकर.  एका भागासाठी ती 14 हजार रुपये मानधन घेत असल्याचे कळतं.

* टोण्या अर्थात विरल माने हा देखील मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये दिसत आहे. तो एका भागासाठी 7 हजार रुपये मानधन घेतो. विरल याचं वय केवळ बारा वर्षे आहे. 

* बाबू दादाही ‘देवमाणूस 2’मध्ये आहे. अंकुश मांडेकर याने बाबू दादाची भूमिका साकारली आहे. अंकुश मांडेकर हे एका भागासाठी 11 हजार रुपये मानधन घेतात. 

* बज्याला कोण ओळखत नाही? दुसऱ्या भागातही बज्या आहे. किरण डांगे  याने बज्याची भूमिका साकारली आहे. किरण डांगे हा एका भागासाठी 19 हजार रुपये मानधन घेतो. 

टॅग्स :'देवमाणूस २' मालिकाटेलिव्हिजनझी मराठी