Join us

'जय जय स्वामी समर्थ'मुळे पूर्ण झाली विकासची इच्छा; सेटवरच मिळाला गावचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 15:56 IST

Vikas patil: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या विकासने या सेटवरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो  सेटवर असलेल्या आंब्याच्या झाडावरुन आंबे पाडताना दिसत आहे.

'बिग बॉस मराठी'च्या (bigg boss marathi) माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे विकास पाटील (vikas patil). हा शो संपल्यानंतर विकासचा सोशल मीडियावरील वावर कमालीचा वाढला आहे. त्यामुळे त्याच्याविषयीचे अपडेट् जाणून घेण्यासाठीही नेटकरी उत्सुक असतात. विकास सध्या जय जय स्वामी समर्थ या मालिकेत काम करत असून या सेटवरचे अनेक अपडेट चाहत्यांना देत असतो. यात त्याने सेटवरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या विकासने या सेटवरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो  सेटवर असलेल्या आंब्याच्या झाडावरुन आंबे पाडताना दिसत आहे. विशेष म्हणजे विकास इतक्या अचूक पद्धतीने नेम धरतो की आंबा बरोबर खाली पडतो. हा व्हिडीओ शेअर करत त्याने "जय जय स्वामी "या वर्षी आंबे खायला गावी नाही जाता आलं...म्हणून सेटवरच हौस भागवून घेतली  पण काही म्हणा झाडावरून तोडून आंबे खाणं म्हणजे सुख'', असं कॅप्शन विकासने या व्हिडीओला दिलं आहे.

दरम्यान, जय जय स्वामी समर्थ या मालिकेत विकासने स्वामीसूत ही भूमिका साकारली आहे. अलिकडेच त्याची या मालिकेत एन्ट्री झाली असून अल्पावधीत त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तसंच त्याने 'अधुरी एक कहानी' , 'बायको अशी हवी', 'अंतरपाट', 'कुलवधू', 'माझीया माहेरा', 'लेक माझी लाडकी', ' वर्तुळ ' या मालिकेत काम केलं आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी