'लेक माझी लाडकी' ही मालिका छोट्या पडद्यावर आता रंजक वळणावर आली आहे.मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेत ऋषिकेशच्या कटकारस्थानांना तोंड देता देता मीरा हतबल झाली आहे. ऋषिकेशकडे दिलेलं सानिकाचं बाळ मीरा परत आणू शकेल का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ऋषिकेशच्या डावपेचांना बळी पडल्यामुळे मीरा सानिकाचं बाळ ऋषिकेशच्या हाती सोपवते. मात्र, त्या बाळाचं अपहरण होतं. या प्रकारानंतर संपूर्ण कुटुंबाकडून मीराला प्रश्न विचारले जातात. मात्र, मीराकडे काहीच उत्तर नसतं. ऋषिकेशकडे दिलेलं बाळ परत आणणं एवढंच तिच्या हाती राहिलेलं आहे. आता ऋषिकेशकडचं बाळ मीरा परत आणू शकेल का, त्यासाठी तिला काय करावं लागेल अशा प्रश्नांची उत्तरं पुढील भागांत उलगडणार आहे.
मालिकांमध्ये काम करणा-या कलाकारांसाठी मालिकेचा सेट जणू दुसरं घर आणि मालिकेतील कलाकार मिळून एक नवं कुटुंब बनतं. मालिकेतील कलाकारांमध्ये काम करता करता एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं. सेटवरच विविध सणांचे सेलिब्रेशन आणि वाढदिवस साजरे होतात. परिणामी मालिकेतील या कलाकारांमध्ये प्रेमाचे आणि आपुलकीचे बंध निर्माण होतात. असंच काहीसं नातं छोट्या पडद्यावरील मालिकेतील कलाकारांमध्ये पाहायला मिळते.
अभिनेता अविनाश नारकर यांनी पुढाकार घेऊन ही वडापाव पार्टी जमवून आणली होती. ऐश्वर्या नारकर यांनी वडे करण्यासाठी मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश नारकर यांच्यासह आशुतोष कुलकर्णी, सायली देवधर, विकास पाटील यांनीही वडे करण्यास हातभार लावला. त्यामुळे मालिकेच्या सेटवरच्या सगळ्यांनाच गरमागरम वडापावचा आस्वाद घेता आला. या वडापावच्या बेताविषयी या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत असलेले अविनाश नारकर सांगतात, 'छान पाऊस पडत असताना आम्हाला सगळ्यांनाच वडापाव खाण्याची इच्छा झाली होती. वडापाव विकत आणण्यापेक्षा आपणच सेटवर करू असे मी ठरवले आणि वडे करण्याचा घाट घातला होता.