Join us

मन झालं बाजिंद: राया अन् कृष्णा सुखरुप घरी परतणार; गुली मावशीचा डाव तिच्यावरच उलटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 14:12 IST

Man Jhala Bajind: राया आणि कृष्णा हे दोघं आपल्या वाटेतून बाजूला व्हावेत यासाठी गुली मावशीने एक डाव रचला असतो.

छोट्या पडद्यावर दररोज असंख्य मालिकांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, या मालिकांच्या गर्दीत अशा मोजक्याच मालिका असतात ज्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. त्यातलीच एक मालिका म्हणजे 'मन झालं बाजिंद'. काही दिवसांपूर्वीच सुरु झालेली ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. त्यातच  राया आणि कृष्णाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरल्यामुळे या मालिकेत रंजक वळण आलं आहे.

राया आणि कृष्णा हे दोघं आपल्या वाटेतून बाजूला व्हावेत यासाठी गुली मावशीने एक डाव रचला असतो. तिच्या या डावामुळे राया आणि कृष्णा आगीने वेढलेल्या शेतात अडकतात. परंतु, या संकटातून दोघंही सुखरूप वाचतात. मात्र, राया आणि कृष्णा जीवंत असल्याचं कोणालाही माहित नसल्यामुळे त्यांचं निधन झालंय या चर्चांना उधाण येतं. इतकंच नाही तर त्यांच्या फोटोलादेखील हार घालण्यात येतात. परंतु, या गोंधळामध्येच राया आणि कृष्णा परत येतात.

दरम्यान, झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये रायाच्या आठवणीत व्याकूळ झालेली त्याची आई घर सोडून जायला निघते. परंतु, त्याचवेळी राया आणि कृष्णा सुखरुप घरी येतात.  त्यामुळे या मालिकेत पुन्हा रंजक वळण पाहायला मिळणार असल्याचं दिसून येत आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार