Join us

मन उडू उडू झालं: कोमातून लवकरच दिपू येणार बाहेर; मालिका पुन्हा मुळ ट्रॅकवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 15:35 IST

Man udu udu zal: दिपू एका भरधाव डेम्पोच्या समोर येते. ज्यामुळे तिला गंभीर दुखापत होऊन ती कोमात जाते. मात्र, आता दिपू कोमातून बाहेर येणार आहे.

छोट्या पडद्यावर सुरु असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे मन उडू उडू झालं. कायम इतरांसाठी धडपड करणारी दिपू आज आयुष्याची लढाई लढत आहे. सानूमुळे दिपू मृत्यूशी झुंज देत आहे. त्यामुळे या मालिकेत सध्या मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, आता लवकरच चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दिपू येत्या भागामध्ये शुद्धीवर येणार आहे. त्यामुळे ही मालिका आता पुन्हा मूळ ट्रॅकवर येणार आहे.

सानूच्या खोट्या प्रेग्नंसीचं सत्य समोर आल्यानंतर ती संपूर्ण देशपांडे कुटुंबाशी नातं तोडून सासरी निघून जाते. यावेळी दिपू तिला समजवण्यासाठी जाते. मात्र, रागाच्या भरात सानू तिला घरातून धक्के मारुन बाहेर काढते. यावेळी दिपू एका भरधाव डेम्पोच्या समोर येते. ज्यामुळे तिला गंभीर दुखापत होऊन ती कोमात जाते. मात्र, आता दिपू कोमातून बाहेर येणार आहे. याविषयीची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दिपूची भूमिका साकारणाऱ्या हृताचं लग्न झालं. त्यामुळे हृता आणि तिचा नवरा प्रतिक हनीमूनसाठी इस्तंबूलला गेले होते. म्हणूनच, हृताला या मालिकेचं चित्रीकरण करणं शक्य नव्हतं. तिच्या गैरहजेरीत या मालिकेमध्ये दिपूला कोमात गेल्याचं दाखवण्यात आलं होतं. मात्र, आता हृता हनीमुनवरुन परत आली असून तिने पुढील भागांचं चित्रीकरण करण्यास सुरुवात केली आहे. म्हणूनच, आता या मालिकेमध्येही दिपू कोमातून बाहेर येणार असल्याचं  दिसून येत आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारऋता दूर्गुळे