Join us

देशपांडेंच्या जावयाला इंद्रा घडवणार अद्दल; भरचौकात तोंडाला फासणार काळं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 15:08 IST

Man udu udu zal: कानविंदे त्यांच्या सुनेचा कशाप्रकारे जाच करतात हे प्रकरण दीपू समोर आल्यानंतर तिने गाजावाजा करु नये यासाठी कानविंदे परिवार दीपू व शलाकाला मारण्याचा प्रयत्न करतात.

छोट्या पडद्यावरील मन उडू उडू झालं ही मालिका सध्या अत्यंत रंजक वळणावर आहे. एकीकडे दीपू-इंद्राच्या प्रेमात मालती अडथळा ठरत आहे. तर, दुसरीकडे शलाकावर सासरच्या मंडळींनी केलेला अन्याय समोर आला आहे. त्यामुळे रागाच्या भरात दीपू शलाकाला पून्हा घरी घेऊन येते. परंतु, दीपूचं हे वागणं न पटल्यामुळे शलाकाच्या सासरचे म्हणजेच कानविंदे परिवार या दोघींच्याही जीवावर उठले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी या दोघींना जीवे मारण्याचा निश्चयही केला आहे. परंतु, त्यांचा हा डाव इंद्रा उधळून लावणार आहे.

कानविंदे त्यांच्या सुनेचा कशाप्रकारे जाच करतात हे प्रकरण दीपू समोर आल्यानंतर तिने गाजावाजा करु नये यासाठी कानविंदे परिवार दीपू व शलाकाला मारण्याचा प्रयत्न करतात. मात्र, या गोष्टीची माहिती इंद्राला मिळते आणि तो कानविंदे परिवार व नयनला चांगलाच धडा शिकवतो.

इंद्रा धर्मवीर चौकात सगळ्यांसमोर नयनला बेदम मारहाण करतो.  इतकंच नाही तर त्याच्या तोंडाला काळं फासून त्याची धिंडदेखील काढतो. त्यामुळे या मालिकेत आता मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, इंद्रा आता शलाकाला न्याय मिळवून देऊ शकेल का? इंद्रा आणि दिपू आता पुढे काय करणार? त्याच्या या वागण्यामुळे मालती पुन्हा नाराज होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावर मिळणार आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनऋता दूर्गुळेटिव्ही कलाकार