Join us

मन उडू उडू झालं : 'यशकडे बघ आणि शिक जरा'; इंद्रच्या 'या' सीनमुळे मालिका होतीये ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 18:00 IST

Mann udu udu zalay: अनेकदा मालिकांमध्ये काही गोष्टींचा अतिरेक केला जातो. त्यामुळेच काही ठराविक सीनला किंवा संवादांना प्रेक्षक कंटाळतात. असाच काहीसा प्रकार 'मन उडू उडू झालं' या मालिकेच्या बाबतीत घडला आहे.

कलाविश्वातील कोणत्याही सेलिब्रिटींसाठीसेलिब्रिटींसाठी ट्रोलिंग होणं हा काही नवीन मुद्दा नाही. मालिकेचं वा चित्रपटाचं कथानक, अभिनय किंवा त्यातील कोणतीही गोष्ट प्रेक्षकांना फारशी पटली नाही की ते ट्रोलिंग करतात. यात अनेकदा मालिकांमध्ये काही गोष्टींचा अतिरेक केला जातो. त्यामुळेच काही ठराविक सीनला किंवा संवादांना प्रेक्षक कंटाळतात. असाच काहीसा प्रकार 'मन उडू उडू झालं' या मालिकेच्या बाबतीत घडला आहे.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये इंद्रा आणि दिपू एकमेकांशी संवाद साधत असतात. परंतु, या संवादामध्ये इंद्रा रडायला लागतो. हा सीन पाहिल्यावर नेटकऱ्यांनी मालिकेला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हा सीन करताना इंद्राचा जो संवाद आहे आणि त्याच्यानंतर जे घडतं त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आज जर इंद्रा रडला ना तर आकाशही रडेल आणि अवकाळी पाऊसही येईल शहरात, असं इंद्रा म्हणतो. त्यानंतर लगेचच विजांचा कडकडाट होतो. त्यामुळे हा सीन पाहिल्यावर नेटकऱ्यांनी ट्रोलिंग सुरु केलं आहे.

दरम्यान, 'अरे, असा पाऊस पडत असेल तर शाळेत उगाचच हवेची वाफ होते, मग ढग होतात वगैरे सांगतात', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, 'अरे त्या यश बघ आणि शिक जरा', असं अन्य एका युजरने म्हटलं आहे.

सध्या ही मालिका रंजक वळणावर येऊन पोहोचली असून इंद्राने दिपूला प्रपोज केलं आहे. परंतु. दिपूने त्याचा प्रस्ताव धुडकावून लागला आहे. त्यामुळे या मालिकेत आता काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनऋता दूर्गुळेसेलिब्रिटीटिव्ही कलाकार