Join us

मुलांसाठी आकाश करणार पिकनिक प्लॅन; पण चिनू-मनूची जमेल का बनीसोबत गट्टी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 14:16 IST

punha kartavya aahe: चिनू-मनू आणि बनी यांची मैत्री व्हावी यासाठी आकाशने खास प्लॅन तयार केला आहे.

छोट्या पडद्यावर सध्या 'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. उत्तम कथानक आणि कलाकारांचा अभिनय यांमुळे ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. सध्या आकाश आणि वसुच्या घरी त्यांच्या लग्नाची गडबड सुरु आहे. तर, दुसरीकडे ही जोडी त्यांच्या मुलांमध्ये मैत्री घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्येच आता आकाशच्या मुली मनु-चिनू आणि वसूची मुलगा बनी यांची एका पिकनिकमध्ये भेट होणार आहे.

फादर्स डे च्या दिवशी बनीचा मोठा अपघात होतो त्यामुळे आकाश त्याला हॉस्पिटलमध्ये अॅडमीट करतो. या सगळ्या गोंधळात आकाशला घरी पोहोचायला उशीर होतो आणि त्याच्या मुलींना फादर्स डे साजरा करता येत नाही. मात्र,आकाशकडे त्या बनीने दिलेलं फादर्स डे चं ग्रिटिंग पाहतात. परिणामी, त्या दोघीही चिडतात. त्यामुळे आकाश त्यांना पिकनिकला घेऊन जायचा प्लॅन करतो.

दरम्यान, आकाशने केलेल्या पिकनिक प्लॅनमध्ये तो बनी आणि वसुंधरालाही सोबत घेऊन जाणार आहे. या पिकनिकमध्ये तीनही लहानग्यांची मैत्री व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. मात्र, आता या तिघांची खरंच मैत्री होते का? मनु-चिनूची नाराजी दूर होते का? हे मालिका पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळणार आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटीमराठी अभिनेता