छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत सध्या अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. लतिका आणि अभिमन्युला त्यांचं घर पुन्हा मिळालं आहे. त्यामुळे जहागीरदारांच्या कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण पसरलं आहे. परंतु, या आनंदावर विर्जन पडणार असल्याचं दिसून येत हे. दौलतला अभ्याचं सत्य समजल्यामुळे तो लतिका आणि अभ्यावर प्राणघातक हल्ला करणार आहे.
कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दौलत, घरात आलेली भानुप्रिया ही कोणतीही स्त्री नसून अभ्या होता हे सत्य आबांना सांगणार आहे. ज्यामुळे संतापलेले आबा अभ्या आणि लतिकावर प्राणघातक हल्ला करणार आहेत.
दरम्यान, आता या मालिकेत आणखी एक नवं वळण येणार आहे. त्यामुळे या मालिकेविषयी प्रेक्षकांची असलेली उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. आता खरंच अभ्या आणि लतिकाचा मृत्यू होणार का? की या संकटातून ते सुखरुप बाहेर पडतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.