Join us

जहागीरदारांच्या घरातून हेमाची होणार हकालपट्टी; दौलतला केलेल्या मदतीचं सत्य येणार समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 17:19 IST

Sundara manamadhe bharali: हेमाचं सत्य जहागीरदारांसमोर आलं असून घरातले तिला घराबाहेर काढणार आहेत. तसंच अभि आणि लतिकाने त्यांची पावलं दौलतच्या दिशेने वळवली आहेत.

छोट्या पडद्यावरील 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत सध्या अनेक रंगतदार वळणं येत आहेत. अभ्याच्या आईचं निधन झाल्यापासून घरातील वातावरण पूर्णपणे बदलून गेलं आहे. यात जोपर्यंत दौलतनेच आईचा खून केलाय हे सत्य समोर आणत नाही तोपर्यंत तिच्या अस्थिंचं विसर्जन करणार नाही अशी शपथ अभ्याने घेतलीये. त्यादृष्टीने त्याने पावलं टाकण्यासही सुरुवात केली आहे. यामध्येच आता हेमाने दौलतला त्याच्या कटकारस्थानात मदत केल्याचं तिचं बिंग घरातल्यांसमोर फुटणार आहे. इतकंच नाही तर तिला जहागीरदारांच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे.

कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हेमाचं सत्य जहागीरदारांसमोर आलं असून घरातले तिला घराबाहेर काढणार आहेत. तसंच अभि आणि लतिकाने त्यांची पावलं दौलतच्या दिशेने वळवली आहेत. त्यामुळे लवकरच ते दौलतचं सत्यदेखील संपूर्ण गावापुढे आणणार आहेत.

दरम्यान, दौलत अभ्याच्या आईच्या मृत्यूला जबाबदार असतो. इतकंच नाही तर या प्रकरणात हेमा पुरावे नष्ट करण्यासाठी दौलतला मदत करते. परंतु, आता तिचं सत्य समोर आल्यामुळे या मालिकेला पुन्हा एक नवं वळण मिळालं आहे.  

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटी