Join us

सुंदरा मनामध्ये भरली: मालिकेत पुन्हा नव्या कलाकाराची एन्ट्री?; भानुप्रियानंतर सत्वशिलाच्या रुपात झळकणार 'ही' अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 19:00 IST

Sundara manamadhe bharli:अलिकडेच या मालिकेत भानुप्रियाचा प्रवेश झाला आहे. मात्र, आता तिच्यानंतर सत्वशिलादेखील या मालिकेत येणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

सुंदरा मनामध्ये भरली  (Sundara Manamadhe Bharli) या मालिकेत सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिमन्युच्या आईचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळालं. मामींच्या मृत्यूमागे दौलत जबाबदार आहे याची कुणकुण लतिका आणि अभिमन्युला आहे. त्यामुळेच दौलतच्या मुखातून हे सत्य बाहेर पडावं यासाठी हे दोघं प्रयत्न करत आहेत.विशेष म्हणजे दौलतचं सत्य समोर यावं यासाठी आता मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अलिकडेच या मालिकेत भानुप्रियाचा प्रवेश झाला आहे. मात्र, आता तिच्यानंतर सत्वशिलादेखील या मालिकेत येणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

अलिकडेच या मालिकेत भानुप्रियाची म्हणजे स्त्री वेशातील अभिमन्युची एन्ट्री झाली आहे. भानुप्रिया म्हणून अभ्या, दौलतच्या घरी घरकाम करणारी मोलकरीण म्हणून गेला आहे. दौलतच्या घरी गेल्यानंतर तो मामींच्या खूनामागचे काही पुरावे गोळा  करणार आहे. मात्र, या भानुप्रियानंतर मालिकेत सत्वशिला येतांना दिसत आहे. 

दरम्यान, मालिकेत नव्याने येणारी ही सत्वशिला दुसरी तिसरी कोणी नसून खुद्द लतिकाच असणार आहे. लतिकाने तिचं लूक चेंज केला आहे. यात ती गुजराती साडीमध्ये पाहायला मिळणार आहे. कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर सत्वशिलाचा एक प्रोमो शेअर केला आहे. यात सत्वशिला म्हणजेच लतिका असल्याचं दिसून येत आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटी