Join us

अरुंधतीच्या आयुष्याची नवी सुरुवात; आशुतोषच्या येण्यामुळे अनिरुद्ध झाला इनसिक्युअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 11:14 IST

Aai kuthe kay karte: आशुतोष आणि अरुंधतीला एकत्र पाहून अनिरुद्ध स्वत:ला इनसिक्युअर फिल करुन घेतल असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

५०० भागांपर्यंतचा प्रवास यशस्वीरित्या पार पाडणारी मालिका म्हणजे आई कुठे काय करते( aai kuthe kay karte). उत्तम कथानक आणि कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. अरुंधती आणि अनिरुद्ध यांचा घटस्फोट झाल्यानंतर दोघांच्याही आयुष्यात अनेक नवनवीन बदल होताना दिसत आहेत. त्याचा कमी-अधिक परिणाम देशमुख कुटुंबावरही होताना दिसतोय. यामध्येच आता अनिरुद्धला ज्याप्रमाणे संजनाची साथ मिळाली. तशीच आता अरुंधतीलाही एका नव्या व्यक्तीची साथ मिळण्याची शक्यता आहे. या मालिकेत आता अरुंधतीचा मित्र आशुतोष केळकरची एण्ट्री होणार आहे. परंतु, आशुतोषला पाहून अनिरुद्ध इनसिक्युअर होणार आहे.

स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अनिरुद्धसमोर आशुतोष केळकर येतांना दिसत आहे. विशेष म्हणजे आशुतोष आणि अरुंधतीला एकत्र पाहून अनिरुद्ध स्वत:ला इनसिक्युअर फिल करुन घेतल असल्याचं दिसून येत आहे. इतकंच नाही तर आशुतोषला एकेकाळी अरुंधती आवडायची हेदेखील त्याच्या लक्षात येणार आहे.

समीर धर्माधिकारी नव्हे तर 'या' अभिनेत्याची होणार अरुंधतीच्या आयुष्यात एण्ट्री

आशुतोष हा अरुंधतीचा कॉलेजमधील मित्र आहे. त्याचं कॉलेज जीवनात अरुंधती आणि तिच्या गाण्यावर प्रेम होतं. परंतु, अरुंधतीचं अनिरुद्धसोबत लग्न झालं आणि त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. मात्र, २६ वर्षांनंतर आशुतोष पुन्हा अरुंधतीच्या आयुष्यात येणार आहे. त्यामुळे या मालिकेला आता नवं वळण मिळणार आहे. 

दरम्यान, आशुतोष केळकर ही भूमिका अभिनेता ओंकार गोवर्धन (Omkar Govardhan) साकारत आहे. यापूर्वी या भूमिकेसाठी समीर धर्माधिकारीच्या नावाची चर्चा होती. परंतु, आता ही भूमिका ओंकार साकारणार आहे. ओंकार गोवर्धन हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. आतापर्यंत त्याने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच त्याची 'सावित्री जोती' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.  

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनटिव्ही कलाकार