'आई कुठे काय करते' (Aai kuthe kay karte) या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी (milind gawali). एकेकाळी रुपेरी पडदा गाजवणाऱ्या या अभिनेत्याने मालिका विश्वातही आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आज बऱ्याचदा सोशल मीडियावर त्यांची चर्चा असते. विशेष म्हणजे मिलिंद गवळीदेखील आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत असतात. बऱ्याचदा ते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनातील लहानमोठे अनुभव, प्रसंग चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यावेळीदेखील त्यांनी असाच एक किस्सा सांगितला आहे. यात अभिनेता अशोक सराफ (ashok saraf) यांनी आपल्या चुकीच्या सवयी मोडण्यासाठी कशी मदत केली हे सांगितलं आहे.
"लहानपणापासून आपण आपल्याबद्दल एक धारणा तयार करतो, अमुक अमुक गोष्टी आपल्याला आवडतात, अमुक आवडतच नाही, लहानपणीच आपलं ठरलेलं असतं की या या भाज्या आपल्याला आवडतात या आवडत नाही, काहींना गोड आवडतं काहींना तिखट आवडतं, असंच आवडतं आपण असेच आहोत, माझे लहानपणी खाण्यापिण्याचे खूप नखरे होते, आणि आई होतीच माझे लाड पुरवायला, माझ्यासाठी वेगळा स्वयंपाक केला जायचा, दहावीनंतर वडिलांनी मला नाशिकला भोसला मिलिटरी स्कूलमध्ये पाठवलं, पहिल्याच दिवशी ताटात जे जेवण आलं, माझ्याबरोबर अनेकांनी तोंडं वाकडी केली, थोडसं खाल्लं आणि ताटात अन्न टाकून उठलो, मेजर राठोड आले शांतपणे म्हणाले “ खाना पुरा खतम करो , एक दाना भी प्लेट मे नही बचना चाहिए” आणि आम्हाला बंदूक घेऊन मोठ्या ग्राउंडला दहा राऊंड मारायची शिक्षा", असं मिलिंद गवळी म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "त्या दिवसापासून आजपर्यंत खाण्यापिण्याचे माझे सगळे लाड नखरे संपले, ताटात जे येईल ते निमुटपणे खायचं नखरे करायचे नाहीत. पण कपड्यांच्या बाबतीत माझे नखरे चालूच होते, मला हे शोभतं , मला ते शोभत नाही , मी हे घालणार मी हे घालणार नाही, असं बरीच वर्ष चाललं होतं, हा रंग मला आवडतो हा रंग मला आवडत नाही, अनेक वर्ष सिनेमांमध्ये मी माझे स्वतःचेच कपडे घेऊन जायचं कारण कपड्यांसाठी मराठी सिनेमाचं बजेट खूप कमी असायचं त्यामुळे त्यांचे साधे स्वस्तातले कपडे मला कधीच आवडले नाहीत, ती माझी सवय अशोक सराफांमुळे मोडली, माझे कपड्यांचे नखरे बघून ते एक दिवस मला म्हणाले “प्रेक्षक कपडे नाही अभिनय बघतात अभिनयाकडे लक्ष दे, मी दोन झब्बा पायजमा वर hit सिनेमे केले आहेत “ आणि त्यानंतर सिनेमा असो सिरीयल असो मी मला जे कपडे ते देतील ते आजपर्यंत निमूटपणे घालत आलो. पण वैयक्तिक जीवनात मला माझ्याच choice चे कपडे घालायला आवडायचे, पण “ आई कुठे काय करते “ दरम्यान बरेचसे events केले. अनेक designers ने माझ्यासाठी costumes create केले . जे माझ्या comfort zone च्या पलीकडचे होते, भोसला मिलिटरीतले मेजर राठोड सारखेच माझे डिझायनर आहेत, डिझायनर भाग्यश्री ,दर्शना शानबाग , प्रणिता तन्मय... अधिकाऱ्याने आणि हक्काने मला experiments करायला सांगतात...दरम्यान, 'आई कुठे काय करते' या मालिकेत मिलिंद गवळी यांनी अनिरुद्ध ही भूमिका साकारली असून त्यांच्या नकारात्मक भूमिकेलाही प्रेक्षक भरभरुन प्रेम देत आहेत. सध्या ही मालिका अत्यंत रंजक वळणावर पोहोचली आहे. लवकरच अरुंधती आणि आशुतोष लग्नगाठ बांधणार आहेत. मात्र, या लग्नात अनिरुद्ध कशाप्रकारे विघ्न आणण्याचा प्रयत्न करतो हे पाहणंदेखील तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे.