Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 3 : कोण आहे 'बिग बॉस'च्या घरातील पहिली स्पर्धक सोनाली पाटील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 19:44 IST

Bigg Boss Marathi 3 :'देवमाणूस' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सोनाली पाटील 'बिग बॉस मराठी ३'मध्ये सहभागी होणारी पहिली स्पर्धक ठरली आहे.

ठळक मुद्देसोनाली पाटील ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने देवमाणूस, वैजू नं १ या मालिकांमध्ये काम केलं आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी'चं तिसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. नुकतीच या पर्वाच्या ग्रँड प्रिमियरला सुरुवात झाली असून अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि महेश मांजरेकर यांनी मोठ्या उत्साहात या पर्वाची सुरुवात केली. त्यानंतर आता 'बिग बॉस'च्या घराला त्याची पहिली सेलिब्रिटी स्पर्धक मिळाली आहे.

'देवमाणूस' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सोनाली पाटील  'बिग बॉस मराठी ३'मध्ये सहभागी होणारी पहिली स्पर्धक ठरली आहे. महेश मांजरेकर यांनी सोनालीला तिच्या नावाची पाटी दिली असून आता सोनालीचा 'बिग बॉस'च्या घरातील प्रवास सुरु झाला आहे.

'बिग बॉस मराठी ३'ला त्यांची पहिली स्पर्धक मिळाल्यानंतर आता आणखी कोणते सेलिब्रिटी या घरात जाणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आता कमालीची वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi 3: लाईट्स, कॅमेरा & अ‍ॅक्शन; महेश मांजरेकरांची रॉयल एण्ट्रीदरम्यान, सोनाली पाटील ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने देवमाणूस, वैजू नं १ या मालिकांमध्ये काम केलं आहे.

टॅग्स :बिग बॉसमहेश मांजरेकर टिव्ही कलाकार