Join us

Bigg boss marathi: मीराला मागावी लागली गायत्रीची माफी; मैत्रीत निर्माण झाला मोठा गैरसमज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 1:00 PM

Bigg boss marathi: जसजसा हा शो पुढे सरकत आहे. तसतसं या दोघींच्या मैत्रीत फूट पडल्याचं दिसून येत आहे. अलिकडेच मीराने एका कारणासाठी गायत्रीची माफीदेखील मागितली आहे.

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेला लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस मराठी(Bigg boss marathi). सध्या या शोचं तिसरं पर्व सुरु असून अनेक सेलिब्रिटी स्पर्धक यात सहभागी झाले आहेत. जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी हे स्पर्धक एकमेकांसोबत राहत असल्यामुळे त्यांच्यात कुटुंबाप्रमाणेच नातं तयार झालं आहे. यातलीच एक जोडी म्हणजे मीरा जगन्नाथ आणि गायत्री दातार. या दोघी 'बिग बॉस मराठी ३'मध्ये सहभागी झाल्यापासून कायम एकमेकांसोबत असल्याचं दिसून येतं. या दोघींमध्ये छान मैत्री झाली आहे. परंतु, जसजसा हा शो पुढे सरकत आहे. तसतसं या दोघींच्या मैत्रीत फूट पडल्याचं दिसून येत आहे. अलिकडेच मीराने एका कारणासाठी गायत्रीची माफीदेखील मागितली आहे.

कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये मीरा, गायत्रीची माफी मागतांना दिसत आहे. यात त्यांच्यात होत असलेल्या संभाषणावरुन मीराचा गायत्रीच्या बाबतीत गैरसमज निर्माण झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. 

हा शो सुरु झाल्यापासून एका ठराविक ग्रुपमध्ये राहून वावरणारी गायत्री आता घरातील दुसऱ्या ग्रुपमध्येही मिसळू लागली आहे. सध्या ती घरातील प्रत्येकासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मीराचा गायत्रीबद्दल गैरसमज निर्माण झाला आहे. गायत्रीने मीराविषयी काही गोष्टी दुसऱ्या ग्रुपला सांगितल्याचं मीराचं म्हणणं आहे. त्यावरुन या दोघी एकमेकींसोबत बोलताना दिसत आहेत. तसंच माझ्या कानावर काही गोष्टी आल्या. आणि, त्यावर मी विश्वास ठेवला असं म्हणत मीराने गायत्रीची माफी मागितली आहे.

दरम्यान, बिग बॉस मराठीचं ३ पर्व हळूहळू फिनालेपर्यंत पोहोचताना दिसत आहे. आतापर्यंत घरातील अनेक स्पर्धकांना हा शो सोडावा लागला आहे. काही दिवसांपूर्वीच तृप्ती देसाई यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. त्यांच्याप्रमाणेच या आठड्यातही घरातील एका स्पर्धकाला हा शो सोडावा लागणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार