छोट्या पडद्यावर तुफान गाजत असलेला रिअॅलिटी शो म्हणजे 'बिग बॉस मराठी' (bigg boss marathi) . सध्या या शोचं तिसरं पर्व सुरु असून आता हळूहळू हा शो ग्रँड फिनालेकडे जात असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे हे पर्व जिंकण्यासाठी घरातील प्रत्येक स्पर्धक जीव तोडून मेहनत करत आहे. यात अनेकदा घरात भांडण होताना पाहायला मिळतात. इतकंच नाही तर चांगली मैत्री असलेल्या स्पर्धकांमध्येही आता खटके उडू लागले आहेत. असाच एक वाद सोनाली (sonali) आणि विकासमध्ये (vikas) होणार आहे.
'बिग बॉस मराठी ३'मध्ये सहभागी झाल्यापासून सोनाली आणि विकास एकाच टीममध्ये असल्याचं पाहायला मिळतं. या दोघांमध्ये छान मैत्रीदेखील आहे. परंतु, आता 'ही पाईपलाईन तुटायची नाय' या साप्ताहिक कार्यादरम्यान दोघांमध्ये वाद होणार आहे.
या कार्यामध्ये सोनालीला असं वाटतं की विकास तिच्यासाठी खेळला नाही. यावर विकास त्याची बाजू मांडताना दिसणार आहे. पण, सोनाली विकासचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसल्याचं दिसून येतं आहे. सोनाली विकासवर आरोप करताना दिसणार आहे.
"ऐक मी तुला सांगते तुझ्या ठिकाणी दूसरा कोणीतरी असता तर तू जे आज केले आहेस ते तू केलं नसतंस", असं सोनाली म्हणते. त्यावर "कारण मला इथे मारामारी, पाडापाडी नाही करायची... मी जे पाहिले ना… टेबलवर त्याचं डोकं आपटल असतं...", असं विकास म्हणतो. "आता त्यांची इच्छा आहे ना तू बसल्यावरती खेळायचं, आता आम्ही तुझ्यासाठी खेळणार. तू माझ्यासाठी नाही खेळलास ना, पण मी तुझ्यासाठी खेळणार".
विकासचे म्हणणे आहे, "मला emotional blackmail करू नकोस. तुझ्यासाठी डोकी फोडून घ्यायची अशी तुझी इच्छा आहे का ? मारामारी करायची होती का? काय करायचं होतं ?" सोनाली म्हणाली, "तुझा गेम माहिती नाही का मला ?" विशाल म्हणाला, "मारामारी कोणीच नव्हतं करत. विकास म्हणाला, सोनाली मला म्हणते तू काही खेळलास नाही... म्हणजे मी मारामारी केली असती तर खेळलो असं होतं का ?"
दरम्यान, सोनाली म्हणाली, तुला उमेदवारी पाहिजे ना ? मग देऊ तुला उमेदवारी... " आणि या दोघांमधील वाद असाच सुरु राहतो. विकासने जी गोष्ट टास्कमध्ये केली नाही वा तो करू शकला नाही त्याचे काही कारणं आहे जे,तो सोनाली आणि विशाल सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. पण सोनाली त्याचं ऐकून घेण्यास तयार नाही. त्यामुळेच विकास त्याचा पॉइंट पटवून देऊ शकेल ? हे आजच्या भागात प्रेक्षकांना कळणार आहे.