Join us

‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील 'ही' अभिनेत्री आहे चिन्मय उदगीरकरची बहीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 11:47 IST

Sundara manamdhe Bharli : अभिनेत्री अक्षया नाईक आणि समीर परांजपे यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

ठळक मुद्दे‘सुंदरा मनामध्ये भरली’ अन् चिन्मय उदगीरकरचं आहे खास कनेक्शन

छोट्या पडद्यावर सध्या तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे 'सुंदरा मनामध्ये भरली'. अभिनेत्री अक्षया नाईक आणि समीर परांजपे यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील प्रत्येक कलाकार आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. यामध्येच मालिकेतील एका अभिनेत्रीचं अभिनेता चिन्मय उदगीरकरसोबत खास कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे.

'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत लतिकाच्या बँकेत काम करणारी तिची महिला सहकारी आठवतीये का? ही भूमिका अभिनेत्री नुपूर सावजी हिने साकारली असून ती चिन्मय उदगीरकरची बहीण आहे. विशेष म्हणजे नुपूर व चिन्मय सख्ये भावंड नाहीत. मात्र, प्रत्येक रक्षाबंधन आमि भाऊबीज ते एकत्र साजरे करतात. काही दिवसांपूर्वीच चिन्मयने नुपूरसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. 

दरम्यान, 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका सध्या रंजक वळणावर आली असून मालिकेत अनेक नवनवीन घटना घडताना दिसत आहेत. त्यामुळे या मालिकेत पुढे नेमकं काय घडणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांमध्ये निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारअक्षया देवधरचिन्मय मांडलेकरसेलिब्रिटी