अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. या शोची रसिकांमध्ये क्रेझ पाहता मराठीतही हा शो सुरू करण्यात आला. मराठीेचे पहिले पर्व हे सचिन खेडकेर यांनी सूत्रसंचालन केले होते.
२०१९मध्ये सोनी मराठी वाहिनीनं 'कोण होणार करोडपती' केलं होतं. पण गेल्या वर्षी वैश्विक महामारीमुळे हा कार्यक्रम करणं शक्य झालं नाही. आता २०२१ मध्ये सोनी मराठी वाहिनीवर 'कोण होणार करोडपती' सुरू होणार आहे. नुकतेच या शोची घोषणा करण्यात आली आहे.
ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं म्हणत या वर्षी 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर करणार आहेत. मराठी घराघरांत सगळ्यांना सचिन खेडेकर परिचित आहेत. आपल्या देहबोलीमुळे आणि आवाजामुळे सचिन खेडेकर हे प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत.
ज्ञानाच्या सामर्थ्याने सामान्य माणसाचे जीवन पालटून टाकणारा शो म्हणून या शोचा लौकिक आहे. खास गोष्ट म्हणजे यंदाच्या सीझनची रजिस्ट्रेशन प्रक्रिया २४ मार्चपासून सुरू होणार आहे.
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या निराशाजनक वातावरणात चैतन्य निर्माण करणारा हा शो ठरेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.