दुस-यांदा लग्नबंधनात अडकणार ही मराठमोळी अभिनेत्री,इंडस्ट्रीतल्या मित्र-मैत्रिणींनी अशा शब्दात दिल्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 10:19 AM
लकरच ऑनस्क्रीनही एक खास विवाहसोहळा रंगणार आहे.त्यासाठी आता ऑनस्क्रीन होणा-या या लग्नाच्या तायारीत मालिकेची स्टारकास्ट बिझी झाली आहे. त्यामुळे ...
लकरच ऑनस्क्रीनही एक खास विवाहसोहळा रंगणार आहे.त्यासाठी आता ऑनस्क्रीन होणा-या या लग्नाच्या तायारीत मालिकेची स्टारकास्ट बिझी झाली आहे. त्यामुळे या लग्नात कुठेही कोणत्याही गोष्टीची कमी वाटु नये म्हणूनच सगळेच कामात गुंतली आहेत.अगदी रिअल लग्नसोहळा पार पडतात अगदी त्याचप्रमाणे रंगणारा हा ऑनस्क्रीन सोहळाही मोठ्या पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहे. आता हो विवाह सोहळा कोणत्या मालिकेत आणि कोणत्या अभिनेता अभिनेत्रींमध्ये पाहायला मिळणार हा प्रश्न तुम्हाला पडणार असरणार.तर खास तुमच्यासाठी हा सोहळा रंगणार आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम रेवती अर्थात अभिनेत्री श्वेता मेहेंदळेचा.मालिकेत रेवतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेताने इतर भूमिकाप्रमाणे रसिकांची पसंती मिळवली आहे.त्यामुळे मालिकेत राधिका,गुरूनाथ आणि शनाया हे तीन मुख्यपात्र असले तरीही रेवती मात्र आपल्या अभिनयाने रसिकांचे लक्ष वेधुन घेण्यात यशस्वी ठरली आहे. त्यामुळे ही मालिका आता कोण्या तीन भूमिकांची राहिली नसून मालिकेतील सगळ्याच भूमिका रसिकांना आपल्याशा वाटु लागल्या आहेत.लवकरच मालिकेत रेवतीचा लग्नसोहळा रसिकांना पाहायला मिळणार आहे.रेवती आणि सुबोध गुप्तेच्या म्हणजेच यश पटवर्धनची यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर आता थेट ते लग्न करतात असा ट्रॅक माालिकेत पाहायला मिळणार आहे.या दोघांच्या लग्नाच्या निर्णयाने त्यांच्या जवळची सर्व मंडळी आनंदीत झाली आहेत. विशेष म्हणजे सीनच्या शूटिंगवेळी तिला तिच्या ख-या लग्नाची आठवण झाली.तिचे मेहंदी सेरेमनी असेल किंवा हळदी सेरेमनी प्रत्येक गोष्ट तिला यावेळी आठवली.म्हणूनच पुन्हा एकदा या रिल लाईफ लग्नावेळी श्वेता तिच्या रिअल लाईफ लग्नाच्या आठवणीत रममाण झाल्याचे पाहायला मिळाले.श्वेता मेहंदळे ही अभिनेता राहुल मेहंदळे याची पत्नी आहे.या गोजिरवाण्या घरात या मालिकेत राहुल आणि श्वेता एकत्र झळकले होते. या मालिकेत काम करत असतानाच दोघांमध्ये आधी मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.यानंतर श्वेता आणि राहुल यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.राहुल आणि श्वेता यांच्या जीवनात आर्य नावाचा त्यांचा मुलगाही आहे.माझ्या नव-याची बायको या मालिकेत गंभीर आणि पुरुषांवर तिरस्कार करणा-या महिलेची भूमिका श्वेता साकारत असली तरी रिअल लाइफमध्ये ती मनमौजी आणि धम्माल मस्ती करणारी आहे.