Join us

मराठमोळी अभिनेत्री सुप्रिया पिळगावकरांनी सांगितले मुलांच्या जीवनातील आजी-आजोबांचे महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2021 6:48 PM

सुप्रिया पिळगावकर लवकरच मालिका कुछ रंग प्यार के ऐसे भी- नयी कहानीमध्ये दिसणार आहेत.

सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कुछ रंग प्यार के ऐसे भी- नयी कहानी ही लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रासंगिक पात्र, भावनिक कथा आणि देव व सोनाक्षी ऊर्फ देवाक्षीमधील केमिस्ट्री ही प्रेक्षकांसाठी नेहमीच दृदयस्पर्शी ठरली आहे. कुछ रंग प्यार के ऐसे भीमधील पुढील भागात प्रेक्षक सुप्रिया पिळगावकर उर्फ ईश्वरी तिच्या नातवांसोबतचे प्रेम दर्शवताना दिसेल.

मुलाच्या जीवनातील आजी-आजोबांचे महत्त्व सांगताना सुप्रिया पिळगावकर म्हणाल्या, आजी-आजोबा आणि नातवंडांमध्ये वयाचे खूप अंतर असूनही ते परस्परांशी जोडले जातात. एवढेच नव्हे तर आपले ज्ञान वेगळ्याच प्रकारे ते परस्परांना शेअर करतात. आजी-आजोबा नातवांना कशा प्रकारे नातवांना सांभाळतात, त्यांच्या मागण्या पूर्ण करतात हे मी खूप वेळा पाहिले आहे. हे सकारात्मक पालकत्त्वाचे स्वरुप आहे. मुलांना काय हवे आहे, हे समजण्यासाठी ते खूप काही ऐकतात आणि नंतर ते अमलात आणतात. त्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो तसेच न घाबरता एखादी नवी गोष्ट ते करू शकतात. माझ्या स्वत:च्या कुटुंबातही मी हे पाहिले आहे. त्यातीलच काही अनुभव घेऊन मी पडद्यावर चितारण्याचा प्रयत्न करतेय.

 त्या पुढे म्हणाल्या, ईश्वरी तिच्या नातवंडांवर प्रेम करते आणि त्यांना सर्वोत्कृष्ट देण्याचा तिचा नेहमीच प्रयत्न असतो. ते तिच्या हृदयाच्या अगदी जवळ असतात, त्यामुळे ती नातवंडांना बिघडवत आहे, हे ती मान्य करत नाही. ईश्वरी आणि तिच्या नातवंडांचे हे नाते प्रेक्षकांना नक्की भावेल, याची आम्हाला खात्री आहे.

  कुछ रंग प्यार के ऐसे भी- नयी कहानी १२ जुलैपासून दर सोमवार ते शुक्रवारी रात्री ८.३० वाजता सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारीत होणार आहे.

टॅग्स :सुप्रिया पिळगांवकर