सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्ह भारताचा सर्वात लाडका कुकिंग रिअॅलिटी शो मास्टरशेफ इंडिया लवकरच आपल्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नव्या आणि उत्साही शेफ्सच्या पाककौशल्याद्वारे हा शो प्रेक्षकांची मने जिंकणार आहे. मास्टरशेफ लवकरच भारताच्या मास्टरशेफला शोधण्याची मोहीम सुरू करणार असून त्यासाठीच्या ऑडिशन्सची सुरुवात कोलकाता येथून होणार आहे व त्यानंतर मुंबई, हैदराबाद आणि दिल्ली इथे या प्रवेशफेऱ्या पार पडणार आहेत. मास्टरशेफ इंडिया शोसाठी २४ सप्टेंबर, १५ ऑक्टोबर आणि ८ ऑक्टोबर रोजी ऑडिशन्स पार पडणार आहे. कोलकात्यामधील ऑडिशन्स २४ सप्टेंबर रोजी, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, पी-१६, तारातला रोड, सीपीटी कॉलनी, अलीपोर, कोलकाता, पश्चिम बंगाल ७०००८८ येथे पार पडणार आहेत. तर दिल्ली ऑडिशन्स १ ऑक्टोबर रोजी हॅप्पी मॉडेल स्कूल, बी२, जनकपुरी, नवी दिल्ली ११००५८ येथे घेण्यात येतील. मुंबईतील ऑडिशन्स १५ ऑक्टोबर रोजी रायन इंटरनॅशनल स्कूल, वास्तू पार्क, ऑफ लिंकिंग रोड, मालाड, एव्हरशाइन नगर, मालाड पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र ४०००६४ येथे सुरू होणार आहेत. हैदराबादमधील ऑडिशन्स ६ ऑक्टोबर रोजी सेंट. अॅन्स कॉलेज फॉर विमेन, ए/७५, सेंट अॅन्स रोड, संतोष नगर, मेहदीपटनम, हैदराबाद, तेलंगणा ५०००२८ येथे सुरू होणार आहेत.
विविध शहरांतील ऑडिशन्स पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष शोमध्ये देशभरातील शेफ्स स्पर्धेसाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. याबाबत शेफ विकास खन्ना म्हणाला की, मास्टरशेफ इंडिया सुरू होत आहे. भारतातील घरोघरीच्या स्वयंपकाघरांमध्ये काय काय पदार्थ बनविले जात आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि शेफ्सच्या गाठोड्यातील या पदार्थांशी जोडलेल्या कहाण्या ऐकण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे. तर शेफ रणवीर ब्रार म्हणाला की, मला कुकिंगचे वेड आहे. ही गोष्ट मी आयुष्यभर जतन केली आहे. तेव्हा, मास्टरशेफ इंडियाचा भाग बनल्यामुळे कुकिंगच्या माझ्या या आवडीची जोपासना होणार आहे. या कार्यक्रमातून कित्येक वर्षांपासूनच्या भारताच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीविषयीची सांगोपांग माहिती मिळणार आहे. या कार्यक्रमाचा भाग बनत असल्याचा मला आनंद आहे आणि भारताच्या मास्टरशेफसाठीची शोधमोहीम जोमदारपणे सुरू करण्यासाठी उत्सुक आहे. ऑडिशन्समध्ये काय घडतेय ते पहायच्या प्रतीक्षेत मी आहे.