Join us

कमवतोस किती? विचारणारी मायरा एका एपिसोडसाठी घेते तब्बल इतकं मानधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 11:02 IST

Mazhi tuzhi reshimgaath : या मालिकेत मायरा वायकुळ ही बालकलाकार परी ही भूमिका साकारत आहे.

ठळक मुद्देक्युट चेहरा आणि गोड संवाद यांच्या जोरावर ही चिमुकली सध्या प्रत्येक नेटकऱ्याच्या मनावर राज्य करत आहे.

कमवतोस किती? असं विचारणारी मायरा माहितीये का तुम्हाला?  सध्या सोशल मीडियावर या चिमुकलीची जोरदार चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत ही चिमुकली महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे क्युट चेहरा आणि गोड संवाद यांच्या जोरावर ही चिमुकली सध्या प्रत्येक नेटकऱ्याच्या मनावर राज्य करत आहे. त्यामुळे कमी कालावधीत मायराचा प्रचंड मोठा फॅन फॉलोवर तयार झाला आहे. इतकंच नाही तर या चिमुकलीविषयी अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुकही आहेत. त्यामुळेच तुमच्या लाडक्या परीचं म्हणजेच मायराचं एका एपिसोडचं मानधन किती आहे ते जाणून घेऊयात.

अलिकडेच झी मराठीवर 'माझी तुझी रेशीमगाठ' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. अभिनेत्री प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे आणि संकर्षण कऱ्हाडे यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या या मालिकेत मायरा वायकुळ ही बालकलाकार परी ही भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे या परीने कमी कालावधीत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. सध्याच्या काळात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मायरा एका एपिसोडसाठी तब्बल १० हजार रुपये मानधन घेत असल्याचं सांगण्यात येतं. 

दरम्यान, मायरापूर्वी छोट्या पडद्यावरील अनेक बालकालाकार विशेष लोकप्रिय झाले आहेत.यात तुझ्यात जीव रंगलामध्ये लाडू ही भूमिका साकारणाऱ्या चिमुकल्या राजवीर सिंह गायकवाड यानेही एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर भूरळ घातली होती. 

टॅग्स :टिव्ही कलाकारश्रेयस तळपदे