अख्या महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आपल्या घरी गणपती बसवतात. यावर्षीही अनेक कलाकारांनी आपल्या घरी गणपती बाप्पाचं थाटात स्वागत केलं. बालकलाकार मायरा वायकुळही आपल्या घरी गणपती बाप्पाची स्थापना केली होती. घरी पाच दिवसांचा गणपती बसवला होता. पाच दिवसांनी बाप्पांना निरोप देताना मायरा वैकुळला रडू कोसळलं.
मायराच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करण्यात आला. व्हिडीओत ती म्हणताना दिसते की, “देवबप्पा, का रे सोडून गेलास मला? रागावलास का माझ्यावर? खरं सांगू आता तुझी खूप आठवण येईल. पुढच्या वर्षी मी तुला खूप मोदक व लाडू खाऊ घालेन, पण तू लवकर ये, मी तुझी वाट बघतेय”. ओल्या डोळ्यांनी तिने बाप्पाला निरोप दिला.
काही दिवसांपुर्वी मायरा आणि परळी तालुक्यातील साईराज केंद्रे हे दोघे गायक, संगीतकार प्रवीण कोळी यांच्या 'देवबाप्पा' या गाण्यामध्ये दिसले होते. दोन्ही बालकलाकारांनी अपल्या अभिनयाने लोकांना भुरळ घातली.
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकातून मायरा घराघरात पोहचली. या मालिकेत बालकलाकार मायरा वायकुळने ‘परी’ची भूमिका साकारली होती. निरागस अभिनयाने मायराने सर्वांचे मन जिंकले. सध्या मायरा ‘नीरजा एक नई पहचान’ या हिंदी मालिकेत काम करत आहे. सध्या इन्स्टाग्रामवरही तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. युट्यूबवर Myra’s corner हे मायराचे चॅनल आहे.