Join us

प्रार्थना बेहरेला 'या' कलाकाराने दिला दम; अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 17:42 IST

Prarthana behere: अभिनयाप्रमाणेच प्रार्थना तिच्या पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असते.  सध्या प्रार्थना सोशल मीडियावर चर्चेत आली असून एका लोकप्रिय कलाकाराने तिला धमकी दिली आहे.

छोट्या पडद्यावर सध्या तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ.  उत्तम अभिनयाच्या जोरावर या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री प्रार्थना बेहरे. अभिनयाप्रमाणेच प्रार्थना तिच्या पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असते.  सध्या प्रार्थना सोशल मीडियावर चर्चेत आली असून एका लोकप्रिय कलाकाराने तिला धमकी दिली आहे. या घटनेचा व्हिडीओ खुद्द प्रार्थनाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सध्या सोशल मीडियावर प्रार्थनाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रार्थनाला माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील बालकलाकार मायरा वायकुळ दम देताना दिसत आहे. विशेष म्हणजे या दोघींचा हा क्यूट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे.

प्रार्थनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये परी म्हणजेच मायरा, प्रार्थनाला तिच्या खुर्चीवर बसू देत नसल्याचं दिसून येत आहे. सोबतच “थांब थांब ही तुझी खुर्ची नाही, ही माझी आहे. त्यावर परी नाव लिहिलंय,”असं सांगतांना दिसत आहे. विशेष म्हणजे प्रार्थनाने यावर आक्षेप घेतल्यावर परी तिला गोड दम देते.

दरम्यान, “अच्छा ही तुझी खुर्ची आहे का? मग मी बाजूला बसू का?” असा प्रश्न प्रार्थना विचारते. यावर ‘हो’…असं उत्तर देत परी पार्थनाला तिच्या बाजूला बसण्यास सांगते. प्रार्थना आणि परी यांचा हा व्हिडीओ १५ सेकंदाचा असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीटिव्ही कलाकार