Join us

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम राधिकाने खरेदी केली आलिशान गाडी; किंमत ऐकून विस्फारतील डोळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 08:38 IST

Anita date-kelkar: अनिताने नुकतीच नवी कोरीकार खरेदी केली असून याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

अनिता दाते (Anita date) हे नाव मराठी प्रेक्षकवर्गासाठी नवीन नाही. अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्ये ती झळकली आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये तिची कायम चर्चा असते. 'माझ्या नवऱ्याची बायको' ही तिची मालिका विशेष गाजली. या मालिकेमध्ये राधिका ही भूमिका साकारुन ती घराघरात पोहोचली. त्यामुळे ती नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चेत असते. यात सध्या सोशल मीडियावर तिच्या नव्या कारची चर्चा होतीये. राधिकाने नुकतीच नवी कोरीकार खरेदी केली असून याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

अनिता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती तिच्या प्रोफेशनल लाइफची कायम चाहत्यांना माहिती देत असते. मात्र, यावेळी तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती दिली आहे. अनिताने नुकतीच एक नवीन कार खरेदी केली आहे. या गाडीसोबतचा एक व्हिडीओ तिने नेटकऱ्यांसोबत शेअर करत त्यांना ही आनंदाची बातमी दिली.

अनिताने Exter Hyundai ही गाडी खरेदी केली असून ज्या शो रुममधून तिने ही गाडी विकत घेतली. त्यांना अनिताचा हा व्हिडीओ त्यांच्या पेजवर शेअर केला आहे. सोबतच तिला टॅगही केलं आहे. या व्हिडीओमध्ये अनिता आपल्या नव्या गाडीच्या चाव्या हातात घेतांना दिसत आहे. नंतर तिने गाडीचं औक्षण करून, केक कापून हा आनंद साजरा केला. तिच्यासोबत ही गाडी रिसिव्ह करायला अभिनेता उमेश जगतापदेखील होते.

अनिताने Exter Hyundai ही गाडी घेतली आहे. कार ट्रेडच्या माहितीनुसार, अनिताने घेतलेल्या या गाडीची किंमत ६ ते १० लाखांच्या आसपास आहे. दरम्यान, अनितावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होतोय. अनिता सध्या इंद्रायणी या मालिकेत आनंदीबाई ही भूमिका साकारत आहे. यापूर्वी ती नवा गडी नवं राज्य या मालिकेत झळकली होती.

टॅग्स :अनिता दातेटेलिव्हिजनटिव्ही कलाकारनाटकसिनेमा