Join us

'माझी तुझी रेशीमगाठ'मधून 'या' अभिनेत्रीने घेतली अचानकपणे एक्झिट; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 11:45 AM

Mazi tuzi reshimgath: अलिकडेच नेहाने जाहीरपणे यशसमोर तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्यामुळे या मालिकेत आता एक नवं वळण आलं आहे.

छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ. आतापर्यंत या मालिकेने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. त्यामुळे ही मालिका सध्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. अलिकडेच नेहाने यशसमोर तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्यामुळे ही मालिका रंजक वळणावर आहे. मात्र, यामध्येच आता अचानकपणे एका अभिनेत्रीने मालिका सोडल्याचं समोर येत आहे. 

या मालिकेतील नेहा, शेफाली, बंडू काकू, परी आणि अशा अनेक स्त्री भूमिका गाजत आहेत. मात्र, या सगळ्यांपैकीच एका अभिनेत्रीने मालिका सोडली आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील तिचे सीन संपल्यामुळे तिने मालिकेतून एक्झिट घेतल्याचं सांगण्यात येतं.

काही दिवसांपूर्वीच या मालिकेत यशच्या गर्लफ्रेंडची जेसिकाची एन्ट्री झाली होती. ही भूमिका रशियन अभिनेत्री जेन कटारिया साकारत होती. मात्र, आता जेसिकाने ही मालिका सोडली आहे. एका पोर्टलने याविषयीचं वृत्त दिलं आहे.

जेन काही भागांपूरतीच या मालिकेत आली होती. त्यामुळे तिच्या भागांचं चित्रीकरण पूर्ण झाल्यामुळे आता तिने मालिकेतून काढता पाय घेतला आहे.  म्हणूनच, यापुढे जेसिका हे पात्र मालिकेत पाहायला मिळणार नाही.

दरम्यान, अलिकडेच नेहाने जाहीरपणे यशसमोर तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्यामुळे या मालिकेत आता एक नवं वळण आलं आहे. परंतु, आता या दोघांचं नात कुठपर्यंत जातं? आजोबांना नेहाचं सत्य समजतं का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारश्रेयस तळपदे