Join us

'माझी तुझी रेशीमगाठ' फेम प्रार्थनानं नवऱ्यासोबत साजरी केली रंगपंचमी, फोटो दिसला सोज्वळ नेहाचा कलरफूल स्वॅग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 16:14 IST

माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत तिने नेहाचे पात्र साकारले होते आणि या पात्राने रसिकांच्या मनात घर केले आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere)च्या नुकतीच 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath) या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेत तिने नेहाचे पात्र साकारले होते आणि या पात्राने रसिकांच्या मनात घर केले आहे. मालिका संपल्यानंतर प्रार्थना सातत्याने चर्चेत येत आहे. प्रार्थनाने नवऱ्यासोबत साजरी केलेल्या रंगपंचमीचे खास फोटो शेअर केलंत. 

 मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्रार्थना बेहरेसोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. प्रार्थनानं नवरा अभिषेक जावकरसोबत धुमधडाक्याता रंगपंचमी साजरी केली आहे. प्रार्थनाचा अभिषेकसोबत एक वेगळाच स्वॅग पाहायला मिळत आहे. प्रार्थनानं हे फोटो शेअर करत म्हटलं आहे की, Colour of love … Happy Holi everyone. प्रार्थनाच्या चाहत्यांनी ही तिला रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिचे हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होतंय. 

प्रार्थना बेहरे हिने मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. तिने पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून करिअरची सुरुवात केली आहे. त्यानंतर तिने मराठी चित्रपटातदेखील काम केले आहे. ‘मितवा’, ‘मिस्टर अँड मिस्टर सदाचारी’, ‘कॉफी आणि बरंच काही’ यांसारख्या चित्रपटात तिने काम केले आहे.

टॅग्स :प्रार्थना बेहरेटिव्ही कलाकार