Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: चौधरी कुटुंबासमोर शेफालीने घेतला समीरसाठी उखाणा; मालिकेत नव्या लव्हस्टोरीची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 19:40 IST

Mazi tuzi reshimgath: सध्या या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत असून शेफाली चक्क चौधरी कुटुंबासमोर उखाणा घेत समीरचं नाव घेते.

'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सध्याच्या घडीला लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जात आहे. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे या मालिकेतील यश, नेहा आणि परी व्यतिरिक्त अन्यही असे काही कलाकार आहेत जे प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे शेफाली. या मालिकेत यश आणि नेहाप्रमाणेच समीर आणि शेफाली यांचीही लव्हस्टोरी हळूहळू खुलताना दिसत आहे. इतकंच नाही तर सुरुवातीला शेफाली दिसली की पळून जाणार समीरदेखील आता तिच्या प्रेमात पडला आहे. 

सध्या या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत असून शेफाली चक्क चौधरी कुटुंबासमोर उखाणा घेत समीरचं नाव घेते. व्हायरल होत असलेल्या या प्रोमोमध्ये पहिल्यांदाच चौधरी कुटुंबात मिथीला आणि विश्वजीत यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला जातो. यावेळी चौधरी कुटुंबाच्या जवळची मंडळी उपस्थित असतात. यात समीर आणि शेफालीदेखील असतात. विशेष म्हणजे यावेळी सगळे जण मिथीलाला उखाणा घ्यायला सांगतात. मात्र, तिला येत नसल्यामुळे शेफाली तिला मदत करते आणि चुकून उखाण्यात समीरचं नाव घेते.

दरम्यान, शेफालीने केलेली ही चूक उपस्थित साऱ्यांच्या लक्षात येते. मात्र, काही झालंच नाही असं घरातील प्रत्येक जण दाखवतो. परंतु, आजोबा आणि यश, समीरची मस्करी करण्याची ही संधी सोडत नाहीत. ते दोघंही त्याची चांगलीच खिल्ली उडवतात. त्यामुळे हा मजेशीर प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु, अद्यापही समीरने शेफालीसमोर त्याच्या प्रेमाची कबुली दिली नाही. त्यामुळे या मालिकेत या दोघांचं नात कुठवर जाणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार