Join us

विश्वजीत-मिथिलामध्ये खुलतीये प्रेमाची कळी; अरुण सरनाईकांच्या गाण्यावर धरला ताल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 18:46 IST

Vishwajeet and mithila dance: सध्या सोशल मीडियावर मिथिला आणि विश्वजीत यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मिथिला आणि विश्वजीत रोमॅण्टिक अंदाजात दिसून येत आहेत.

छोट्या पडद्यावर सध्या माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका चांगलीच लोकप्रिय होताना दिसत आहे. अनेक अडथळे पार केल्यानंतर फायनली यश आणि नेहाचं लग्न होत आहे. त्यामुळे या दोघांच्या घरी सध्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. यामध्येच चिमुकल्या परीमुळे पॅलेसमधील वातावरणही बदललं आहे. घरातील विस्कटलेली नाती पुन्हा नव्याने जुळून येत आहेत. यातलंच एक नातं म्हणजे मिथीला आणि विश्वजीत. परीमुळे या दोघांमधील मतभेद दूर झाले आहेत.

सध्या सोशल मीडियावर मिथिला आणि विश्वजीत यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मिथिला आणि विश्वजीत रोमॅण्टिक अंदाजात दिसून येत आहेत. या दोघांनीही अभिनेता अरुण सरनाईक यांच्या गाण्यावर ताल धरल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, मिथिला आणि विश्वजीत यांनी चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातील अरुण सरनाईक यांच्यावर चित्रीत झालेल्या एक लाजरान साजरा मुखडा या गाण्यावर ताल धरला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसंच या दोघांचं नवं नातंदेखील प्रेक्षकांना कमालीचं आवडतं असल्याचं पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार