Join us

ईशा केसकरने या कारणामुळे शेअर केला आहे प्रियकरासोबतचा हा खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 4:13 PM

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनायाने म्हणजेच ईशाने काही दिवसांपूर्वी तिच्या जीवनातील खास व्यक्तीची सोशल मीडियाद्वारे फॅन्सना माहिती दिली होती.

ठळक मुद्देतो आजचा दिवस आहे. दोन वर्षांपूर्वी हा मुलगा मला डेट करायला लागला. हॅपी टू अँड मेनी मोअर टू कम असे देखील तिने यासोबत लिहिले आहे. तसेच लग्न कधी करणार हे विचारू नका असे देखील तिने तिच्या फॅन्सना सांगितले आहे.

कलाकार मंडळींच्या खाजगी जीवनाविषयी रसिकांना जाणून घेण्याची इच्छा असते. त्यांच्या जीवनातील लहानसहान गोष्टी जाणून घ्यायला रसिक आतुर असतात. कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांशी संवाद साधतात. आपल्या जीवनातील गोष्टी, फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. 

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनायाने म्हणजेच ईशाने काही दिवसांपूर्वी तिच्या जीवनातील खास व्यक्तीची सोशल मीडियाद्वारे फॅन्सना माहिती दिली होती. सोशल मीडियाद्वारे तिने चाहत्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी ईशाच्या जीवनातील खास व्यक्ती म्हणजे अभिनेता ऋषी सक्सेना असल्याचे तिने सांगितले होते. आता ईशाने इन्स्टावर तिचा आणि ऋषीचा नवा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ते दोघे स्विमिंग पूलमध्ये असल्याचे दिसून येत असून या फोटोसोबत तिने खूपच इंटरेस्टिंग गोष्ट लिहिली आहे. तिने लिहिले आहे की, तो आजचा दिवस आहे. दोन वर्षांपूर्वी हा मुलगा मला डेट करायला लागला. हॅपी टू अँड मेनी मोअर टू कम असे देखील तिने यासोबत लिहिले आहे. तसेच लग्न कधी करणार हे विचारू नका असे देखील तिने तिच्या फॅन्सना सांगितले आहे.

चला हवा येऊ द्याच्या सेटवर ऋषी आणि ईशा यांची दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. तेव्हापासून ते दोघे नात्यात असून ते दोघे अनेकवेळा सोशल मीडियावर त्यांचे दोघांचे फोटो पोस्ट करत असतात. 

ईशाला जय मल्हार या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने साकारलेली बानोची भूमिका चांगलीच गाजली होती. तर ऋषीने काहे दिया परदेस या मालिकेत शिवची भूमिका साकारली होती. ही मालिका आणि या मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. 

सध्या ईशा छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत काम करतेय. ही मालिका सध्या निर्णयाक वळणावर आहे. मालिकेच्या कथानकातील ट्विस्ट आणि टर्न्समुळे मालिका रसिकांना भावतेय. या मालिकेतील शनाया म्हणजे अभिनेत्री ईशा केसकरचा अभिनय रसिकांना भावतोय. रसिका सुनीलची एक्झिट झाल्यानंतर इशाने या भूमिकेला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. 

टॅग्स :ईशा केसकरऋषी सक्सेनामाझ्या नवऱ्याची बायको