झी मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. या मालिकेसोबतच या मालिकेतील मुख्य पात्रांनीदेखील रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले. आहे. गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास ३ वर्षांपूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय.
आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत.आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, 'स्वावलंबी' राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी 'नखरेल' शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे.
ईशा अभिनयावर जितकी मेहनत घेते, तितकीच मेहनत ती फिटनेससाठीही घेते.
झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया ही भूमिका मी साकारली तेव्हा मला तब्बल ११ किलो वजन कमी करावे लागले. ही भूमिका स्वीकारल्यानंतर माझ्या शरीरयष्टीमध्ये झालेल्या बदलात मी किंचितसाही फरक पडू दिला नाही. याचे कारण म्हणजे व्यायाम आणि उत्तम डाएट."