Join us

गुरु देणार का नोकरीचा राजीनामा?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2018 5:12 PM

‘गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास वर्षभरापूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय.

ठळक मुद्दे'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका आता खरी रंगात आली आहेराधिका गुरुनाथच्या घटस्फोटाचा महासंग्राम आता कोर्टात चांगलाच रंगत आहे

‘गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास वर्षभरापूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत. आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, 'स्वावलंबी' राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी 'नखरेल' शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला 'बिचारा' गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. नवनवीन ट्विस्ट्स आणि टर्न यामुळे दिवसेंदिवस रोमांचक आणि रंजक बनत चाललेल्या या मालिकेने आता घेतलंय एक नव वळण!

'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका आता खरी रंगात आली आहे. राधिका गुरुनाथच्या घटस्फोटाचा महासंग्राम आता कोर्टात चांगलाच रंगत आहे. जवळजवळ केस राधिकाच्या बाजूने झुकत असताना पण गुरु आजारी पडल्याचं खोटं नाटक करून कोर्टाची पुढची तारीख घेतो. आईला त्याची काळजी आहे हे तो चांगलाच जाणून आहे आणि त्यामुळे कपटी, खोटा गुरुनाथ अजूनही हार मनात नसून आईचे मन आपल्याबाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे. आईच्या मदतीवर गुरु ही केस जिंकणार का? कि तोंडावर पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्याचबरोबर गुरूच्या ऑफिसमध्ये त्याचे दोन्ही बॉस चांगलेच संतापले असून ते त्याला धारेवर धरतात. या सगळ्या काटकटीत गुरु राजीनामा देणार असे बोलतो पण त्याच्या या बोलण्याला न जुमानता त्याचे बॉस त्याला नुकसान भरपाई करण्याची चेतावनी देतात. मग गुरु खरंच राजीनामा देणार का? आणि दिला तर मग शनाया गुरुसोबत राहणार का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.

टॅग्स :माझ्या नवऱ्याची बायको