'बिग बॉस १६' चा फिनाले सोहळा काल धडाक्यात पार पडला. तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेला पुण्याचा रॅपर 'एमसी स्टॅन' विजेता ठरला. एमसी स्टॅन नेहमीच त्याच्याजवळ असलेल्या महागड्या वस्तूंमुळे प्रसिद्ध झाला होता. मग ते '८० हजार के जुते' हे रील त्याच्यामुळेच सुरु झाले. एमसी स्टॅनचं खरं नाव 'अल्ताफ शेख' असं आहे. अल्ताफ शेख पासून ते एमसी स्टॅन पर्यतचा त्याचा नेमका प्रवास कसा होता बघुया.
अल्ताफ 'एमसी स्टॅन' कसा बनला ?
अल्ताफ शेख हा पुण्याचा.त्याचे वडील रेल्वेमध्ये हवालदार होते. पुण्यातील ताडीवाला रोड येथे त्याचे कुटुंब वास्तव्यास होते. १५ वर्षांपूर्वी शेख कुटुंब मुंबईत आले. आठवीत असल्यापासूनच अल्ताफला गाणं लिहिण्याची आणि परफॉर्म करण्याची आवड होती. तसेच तो जगप्रसिद्ध रॅपर एमिनेमचा खूप मोठा चाहता आहे. एमिनेमला चाहत्यांनी स्टॅन असं नाव दिलं आहे. म्हणूनच त्याने स्वत:चे नाव एमसी स्टॅन केले.
'एमसी स्टॅन'ची लोकप्रिय गाणी
तरुणांना रॅपचे वेड आहेच. हेच हेरुन एमसी स्टॅनने अशी काही गाणी लिहिली जी आजच्या काळातील तरुणांच्या नक्कीच पसंतीस पडतील. त्यातलेच एक 'वाता' हे गाणं चांगलंच लोकप्रिय झालं आणि एमसी स्टॅन प्रसिद्धीझोतात आला. गाण्याला 21 मिलियन व्ह्यूज मिळाले. त्याने रॅपर रफ्तारसोबत देखील गाणं गायलं आहे. १२ व्या वर्षीच त्याने कव्वालीच्या माध्यमातून संगीतक्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. 'समझ मेरी बात को' हे त्याचं आणखी एक लोकप्रिय गाणं.तसेच त्याने 'अस्तरफिरुल्ला' या गाण्यातून त्याच्या आयुष्यातील संघर्षाविषयी भाष्य केलं. याशिवाय 'तडीपार' या गाण्यामुळे त्याला खरे यश मिळाले.
एमसी स्टॅन कोट्यवधींचा मालक
23 वर्षीय एमसी स्टॅन कोट्यवधींचा मालक आहे. गाणीआणि कॉन्सर्टमधून तो महिन्याला लाखो रुपये कमावतो. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या एमसी स्टॅनला मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला आहे. कुटुंबियांनीदेखील त्याला त्याच्या गाण्यांमुळे टोमणे मारले आहेत. पण तरीही त्याने त्याची आवड जोपासली. आज त्याची गाणी लोकप्रिय झाली असून तो सध्या एक प्रसिद्ध रॅपर आहे. एमसी स्टॅनने सांगितले की, त्याने अवघ्या 3-4 वर्षांत इतके नाव आणि पैसा कमावला आहे. एमसी स्टॅनची एकूण संपत्ती जवळपास ५० लाख आहे.
'बिग बॉस १६' चा विजेता
‘बिग बॉस १६’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर एमसीने चाहत्यांचे मनापासून आभार मानलेत.सलमानने त्याला बिग बॉस १६ व्या सीझनची ट्रॉफी सोपवली. त्यासोबत ३१ लाख ८० हजार रोख रकमेचा धनादेशही सुपूर्द केला.