Join us

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत होणार या अभिनेत्रीची एन्ट्री, प्रेग्नेंन्सीमुळे मिनाक्षी राठोडने घेतला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 18:25 IST

या मालिकेतील माई, दादा, गौरी, जयदीप, शालिनी, देवकी या सर्व पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. आता या मालिकेत एक नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta)मधील नवनवीन ट्विस्टमुळे मालिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. या मालिकेतील माई, दादा, गौरी, जयदीप, शालिनी, देवकी या सर्व पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. आता या मालिकेत एक नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे.

मालिकेत देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनाक्षी राठोड सध्या प्रेग्नेंट आहे. त्यामुळे देवकी मालिकेतून ब्रेक घेणार असल्याची माहिती आहे. तिची भूमिका अग्गंबाई सासूबाई मध्ये मॅडची भूमिका साकारणारी अभिनेत्री भक्ती रत्नपारखी करणार आहे. भक्तीचा सेटवरचा फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. त्यामुळे आता लवकरच आपल्याला देवकीची भूमिका साकारताना भक्ती दिसणार आहे.

‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेच्या आधी भक्ती रत्नपारखी हिने ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या शो मधून प्रेक्षकांना खळखळून हसवले.भक्तीने अक्षय कुमार आणि परेश रावल ह्यांच्यासोबत ‘ओह माय गॉड’ ह्या चित्रपटात काम केलेले आहे. ह्यासोबतच तिने ‘सी कंपनी’, ‘देऊळ’ ह्यासारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं आहे. भक्तीचा नवरा हा देखील अभिनेता आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकार