सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘कुछ रीत जगत की ऐसी है’ (Kuch Reet Jagat Ki Aishi Hai) या मालिकेच्या सध्या सुरू असलेल्या कथानाकात, रतनशी कुटुंबीय एकत्र येऊन त्यांच्या घरात नंदिनीचे उत्साहात स्वागत करण्याची योजना आखतात. हेमराजने एक गुप्त ताकीद देऊन या उत्सवात व्यत्यय आणला आहे. दरम्यान, रूपा आणि हेतल, नैनीला गुपचूप घरात आणल्याबद्दल रौनकशी वादावादी करतात. त्यांनी परिस्थिती लपविण्याचा प्रयत्न करूनही नंदिनी आणि हेमराज या दोघांना काहीतरी गडबड असल्याचा सुगावा लागतो. तणाव वाढत जातो, गुपित उघडकीस येते आणि रतनशी कुटुंबातील नात्यांचा गुंता नंदिनीपुढे उलगडू लागतो. या भव्य विवाह नाट्याचा एक भाग असलेल्या नंदिनीचा पेहेराव परंपरा आणि ऐश्वर्य यांचे परिपूर्ण मिश्रण दर्शवतो. नंदिनीचा ३५ किलो वजनाचा गेटअप पाहण्यासारखा आहे. त्यात बारकाईने केलेल्या भरतकामाने सुशोभित असा अप्रतिम लेहेंगा मनाला भुरळ पाडणारा आहे. त्याच्या सौंदर्यात भर घालणारा बारीक बारीक सोन्याची कलाकुसर करून सजवलेला लाल दुपट्टा, नंदिनीच्या पोषाखाला शाही रूप देतो. तिच्या वधू वेशातील प्रत्येक पैलू अगदी नाकातील नथीपासून ते उत्कृष्ट दागिन्यांपर्यंत, तिच्या शाही थाटात भर घालतो.
'कुछ रीत जगत की ऐसी है'मधील लग्नाच्या सीनसाठी मीरा देवस्थळेनी परिधान केला ३५ किलोचा लेहेंगा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 5:52 PM