'शिवा' मालिकेत (Shiva Serial) संपूर्ण देसाई कुटुंबाचा गुढी पाडवा उत्साहात साजरा झाला. प्रभात फेरी आणि नाट्य सादरीकरणासह देसाई कुटुंबांनी गुढी पाडव्याचा आनंद लुटला. आता शिवा सिताईला बालपणीच्या आठवणींची भेट देणार आहे. गुढीपाडवा सीन शूट करताना मीरा वेलणकरने बाईक चालवली आहे आणि हा अनुभव शेअर केला आहे.
शिवा सिताईचे लाडके बालपणीचे खेळ जसं की आंधळी कोशिंबिरी आणि तिच्या जिवलग मित्रांसोबत एक खास भेट घडवून आणण्याची प्लानिंग करत आहे. किर्ती, दिव्या आणि जगदीशसोबत गुपचूप हाणून पाडण्याची योजना आखते, ज्याची शिवा आणि आशूला कुठलीच कल्पना नाही. त्यातच एका शाळेत अत्याचाराची घटना नवीन वळण घेते. एका शाळकरी मुलीचा छळ होतो. सिताई सुचवते की शिवाने मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण द्यावे. प्रेरित होऊन शिवा स्वसंरक्षण वर्ग सुरू करते. जसे शिवाला सिताई नवीन गोष्टी शिकवत आणि सुचवत आहे तसेच शिवा, सिताईला बाईक चालवणं आणि लहानपण परत जगायला शिकवत आहे.
मीरा वेलणकरने साडी नेसून चालवली बाईक
गुढीपाडवा सीन शूट करताना सिताई म्हणजेच मीरा वेलणकरने साडी नेसून बाईक चालवली आणि आपल्या या अनोख्या अनुभवाबद्दल बोलताना मीरा म्हणाली, "सिताई सारख्या पात्राला बाईक शिकवली जात आहे, असा प्रसंग आम्ही हल्लीच शूट केला. मला असा सीन शूट करायला मिळाला याचा प्रचंड आनंद आहे. मुंबईतील फिल्मसिटीत आम्ही हा सीन शूट केला. तशी मला स्कुटी चालवता येते पण गियरची बाईक मी कधीच चालवली नाही. गियर कुठे असतात हे ही आधी मला माहित नव्हतं. आमच्या मालिकेचे दिग्दर्शक त्यांनी आधी विचार केला होता की बाईक ढकलू आणि सीन पूर्ण करू, पहिला शॉट आम्ही तसाच केला पण मला काही मज्जा आली नाही. तेव्हा मी त्यांना सांगितलं तर मी सरांना सांगितले की मला एक तरी शॉट असा द्यायचा आहे. जिथे मी स्वतंत्रपणे बाईक चालवत आहे.
हे फक्त मला 'शिवा' मालिकेमुळे करायला मिळाले
ज्या दिवशी बाईकचा सीन होता त्याच दिवशी त्या सीनमध्ये मी बाईक चालवायला शिकले. तुम्ही सर्वानी तो सीन पहिला असेलच जिथे शिवा माझ्या बाईकच्या बॅकसीटवर येऊन बसते आणि माझी बाईक कंट्रोल करते हा शॉट देताना आम्ही बाईक चालवली. त्या सीनमध्ये शिवा माझी बाईक चालवते आणि कंट्रोल करत आहे असे दाखवले आहे पण खरेतर तिचे हाथ आणि पाय पोहचणे कठीण होत होते. त्यावेळेस ती बाईक कंट्रोल करून मी चालवत होते. हा सीन करताना खूप मज्जा आली आणि सेटवर सर्वाना आश्चर्य वाटलं आणि दिग्दर्शक सर म्हणले कमाल आणि आम्ही तो सीन पूर्ण केला. हे फक्त मला 'शिवा' मालिकेमुळे करायला मिळत आहे, असे मीरा वेलणकर म्हणाली.