'इश्कबाज' मालिकेचा विस्तारित भाग ‘दिल बोले ओबेरॉय’नावाने रसिकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2017 08:06 AM2017-02-09T08:06:33+5:302017-02-09T13:36:33+5:30
सध्या भारतीय मालिकाविश्वात वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. विशेष म्हणजे हे प्रयोग रसिकांच्या पसंतीस उतरत आहेत. आता भारतीय मालिका ...
स ्या भारतीय मालिकाविश्वात वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. विशेष म्हणजे हे प्रयोग रसिकांच्या पसंतीस उतरत आहेत. आता भारतीय मालिका विश्वात आणखी एक नवा प्रयोग केला जाणार आहे. इश्कबाज मालिकेतील विस्तारित भाग ‘दिल बोले ओबेरॉय’नावाने प्रसारित केले जाणार आहे.यापूर्वी मालिका विश्वात कधीही न झालेला हा प्रयोग करण्याचे धाडस या मालिकेच्या टीमने केला आहे.
महिलाकेंद्रित मालिकांच्या गर्दीत ‘इश्कबाझ’ ही पुरुषप्रधान मालिका सादर केली होती. मालिकेतील तीन ओबेरॉय बंधू हे अत्यंत देखणे असले, तरी त्या प्रत्येकाचे स्वभाव आणि जीवनशैली अगदीच भिन्न होती. मात्र त्यांच्यातील सर्वात समान धागा हा बंधूप्रेमाचा होता. शिवाय, ओंकार आणि रुद्र हे तीन भाऊ, त्यांची आलीशान जीवनसरणी आणि भव्य सेट यामुळे या मालिकेनेने प्रेक्षकांच्या मनाची लवकरच पकड घेतली आणि त्यांच्या अपेक्षाही वाढविल्या.आता या बंधूंच्या जीवनाचा अधिक जवळून वेध घेणारी ‘दिल बोले ओबेरॉय’ ही ‘इश्कबाझ’ मालिकेचीच विस्तारित आवृत्ती असलेली मालिका 13 फेब्रुवारीपासून प्रसारित केली जाणार आहे.एखाद्या चालू मालिकेतील व्यक्तिरेखांच्या जीवनावर आधारित नवी मालिका मूळ मालिकेद्वारे प्रसारित करण्याची घटना भारतीय टीव्हीच्या पडद्यावर प्रथमच घडणार आहे.
‘इश्कबाझ’ ही मालिका सोमवार ते शनिवार रोजच्या वेळेनुसार सुरू राहील. पण त्यातील ओबेरॉय बंधूंच्या जीवनावर अधिक झोत टाकणारी ‘दिल बोले ओबेरॉय' ही उपमालिका त्याचवेळी प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेत ओंकार आणि रुद्र या ओबेरॉय बंधूंच्या जीवनाचा आणि त्यांच्या प्रेमजीवनाचा अधिक जवळून वेध घेतला जाणार आहे. शिवाय ओबेरॉय आणि त्याची प्रेयसी अन्निका यांच्यातील दुरावा सुरू असून रुद्रला सौम्याबरोबर झालेले आपले लग्न लपवून ठेवायचे असल, तरी त्याचे तिच्यावर निस्सीम प्रेमही आहे. उलट ओंकार हा आता पूर्णपणे बदलला आहे. प्रेम आणि चांगुलपणावरील त्याचा विश्वास पार नष्ट झाला आहे. या बंधूंच्या जीवनातील नाट्य़ आता ‘डीबीओ’मधून उलगडले जाणार आहे.‘दिल बोले ओबेरॉय’मध्ये राहुल देव, सुष्मिता मुखर्जी, निधी उत्तम आणि श्रेणु पारेख हे कलाकार असून श्रेणु पारेख ही तब्बल दोन वर्षांनंतर टीव्हीच्या पडद्यावर पुनरागमन करतेय. ओंकाराची प्रेयसी गौरी कुमारी शर्मा हिची भूमिका श्रेणु साकारणार आहे.