Join us  

'बिग बॉस 17'च्या टॉप 5 मध्ये पोहचलेल्या मन्नारा चोप्राचं खरं नाव आणि आडनाव माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 10:15 AM

मन्नारा चोप्राचं खर नावं आणि आडनाव जाणून घेऊया.

'बिग बॉस 17' हा सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेला शो आहे. सलमान खानच्या या शोच्या ग्रँड फिनालेची अनेकांना उत्सुकता आहे. येत्या 28 जानेवारीला 'बिग बॉस 17' महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. सध्या या शोमध्ये केवळ टॉप 5 स्पर्धक उरले आहेत. अभिषेक कुमार, अंकिता लोखंडे, मुनावर फारुकी, मन्नारा चोप्रा आणि अरुण महाशेट्टी हे या टॉप 5 स्पर्धकांमध्ये आता तगडी स्पर्धा होणार आहे. बिग बॉस गाजवणारी मन्नारा चोप्राचं खर नावं आणि आडनाव माहिती आहे का?. शिवाय तिचं बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राशी नेमकं कोणतं नात आहे ते आपण जाणून घेऊया. 

टॉप 5 स्पर्धकांमध्ये पोहचल्यामुळे मन्नारा सध्या सोशल मीडियावर चर्चचा विषय ठरली आहे. प्रियांका चोप्राची बहीण असल्याचं मन्नारा सांगितलं होतं. पण, त्यांच्यातील नेमकं नातं मात्र ठाऊक नव्हतं.  मन्नारा ही प्रियांका चोप्राची आते बहीण आहे. अर्थात मन्नारा ही प्रियांका चोप्राच्या मामाची मुलगी आहे. या नात्याने मधू चोप्रा या मन्नाराच्या आत्या आहेत. तर मन्नाराचं खरं नाव आणि आडनाव वेगळंच आहे, पण सिनेइंडस्ट्रीत येण्यासाठी तिनं चोप्रा आडनाव लावलं आहे. मन्नाराला बार्बी हांडा या नावानेही तिला ओळखलं जातं. 

नुकतंच प्रियांकाने बहिणीला पाठिंबा देण्यासाठी खास पोस्ट शेअर केली होती. प्रियांकानं 'बिग बॉस 17'मधला मन्नाराचा फोटो शेअर करत लिहलं, 'तु तुझं सर्वोत्तम दे आणि बाकी गोष्टींचा विचार करु नकोस.carpe diem मन्नारा'. यासोबतच प्रियांकाने हार्ट इमोजी शेअर केला होता. तसंच प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनीही मन्नारासाठी खास व्हिडीओ शेअर करत तिला पाठिंबा दर्शवला होता. 

मन्नारा ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. भर कार्यक्रमात दिग्दर्शकाने गालावर किस केल्यामुळे मन्नारा चोप्रा चर्चेत आली होती. तिने तेलुगु, तमिळ, कन्नडबरोबरच हिंदी चित्रपटांतही काम केलं आहे.  तिने 'जिद' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण खरी ओळख तिला आता बिग बॉसमुळेच मिळाली आहे.  बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणारी पहिली सदस्य असलेली मन्नारा बिग बॉसची ट्रॉफी उंचावणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटीप्रियंका चोप्राटिव्ही कलाकार