'इट्स नॉट दॅट' सिंपलच्या सक्सेसनंतर 'अनटॅग' वेब सिरिज रसिकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2017 4:46 PM
टीव्ही सिरिजप्रमाणेच वेब सिरिजला मिळाणारी लोकप्रियतेमुळे वेगवेगळ्या विषयांवर अनेक वेबसिरिज आगामी काळात रसिकांच्या भेटीला येणार आहेत.'इट्स नॉट दॅट' ...
टीव्ही सिरिजप्रमाणेच वेब सिरिजला मिळाणारी लोकप्रियतेमुळे वेगवेगळ्या विषयांवर अनेक वेबसिरिज आगामी काळात रसिकांच्या भेटीला येणार आहेत.'इट्स नॉट दॅट' सिंपलच्या सक्सेसनंतर एक नवीन वेब सिरिज रसिकांना पाहता येणार आहेय.या वेब सिरिजमध्ये काही विषय जे उघडपणे बोलले जात नाही, ते अगदी सहज दाखवण्यात येणार असल्याचे कळतेय.जाड असणं, विचित्र दिसणं, गे असणं किंवा रंगाने सावळे असणं हे काही चुकीचं नसतं आणि हे असं आयुष्य जगत असताना त्यांना ऑफिसमध्ये कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागणे अशा सगळ्या गोष्टी 'अनटॅग... अनटॅग' ही वेबसरिजमध्ये उलगडण्यात येणार आहेत.'अनटॅग'मधून एक गोष्ट सांगितली जातेय ती म्हणजे कोणतीही व्यक्ती जन्म घेताना मी गे आहे किंवा मी जाड आहे असा टॅग घेऊन येत नाही. मात्र असे आयुष्यात फॅक्ट्स असतानाही अशा व्यक्तींचं आयुष्य कसं असतं याचं चित्रिकरण अनटॅगमध्ये दाखवले जाणार आहे.या सिरिजमध्ये अशा टॅगविषयीच न बोलता या व्यक्ती आपापल्या आयुष्यात नाव कमावलेल्याही असू शकतात हे सांगण्याचादेखील प्रयत्न यातून केला आहे. लाईफमध्ये काही तरी अचिवमेंट केली असतानाही समाजाच्या दृष्टिकोनातून जो टॅग लावला जातो आणि त्यानंतर आयुष्यात येणारी वळणं.हे उत्तम प्रकारे मांडण्याचा प्रयत्न या वेब सिरिजमध्ये करण्यात आलाय. तरूणाईला लक्षात घेत ही वेब सिरिज एका वेगळ्या धाटणीची आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. यामध्ये इंडियन आयडॉल फेम मयांग चॅंग, अभिनेत्री दिपनिता शर्मा, बिग बॉस फेम अभिनेता शिव पंडित,वीजे ऍंडी,अंजली आनंद यांच्या भूमिका आहेत.व्हिडिओ ऑन डिमांड प्लॅटफॉर्म असलेल्या वूटवर ही वेब सिरिज सुरू होणारे. झहीर शेख यांनी ही वेबसिरीज लिहीली असून अशिमा चिब्बर यांनी सिरिजचं दिग्दर्शन केलं आहे.