‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत कृष्णाची मध्यवर्ती भूमिका साकारणारी मेघा चक्रबोर्ती हिने आपल्या दमदार व्यक्तिरेखेने प्रेक्षकांना आपलेसे करून टाकले आहे. मालिकेतील कृष्णा ही महत्त्वाकांक्षी स्वभावाची असून तिची काही स्वप्नं असतात. मेघानेही आपल्यातील अभिनयगुणांचा कस लागेल अशा भूमिका साकारून स्वत:पुढे मानदंड उभा करण्याचा निर्धार केला आहे.
मेघा म्हणाली, “मालिकेतील माझ्या कृष्णा या व्यक्तिरेखे इतकीच मीसुध्दा महत्त्वाकांक्षी आहे. मी जेव्हा एखादी गोष्ट हाती घेते तेव्हा त्यात माझं सर्वस्व ओतते. मी माझ्या अभिनय कारकीर्दीबाबत खूपच गंभीर असून माझ्या अभिनयात सतत सुधारणा करण्याचा माझा प्रयत्न असतो. मला माझा स्वत:चा ठसा निर्माण करायचा आहे आणि या क्षेत्रात स्वत:च वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करायचं आहे. कृष्णा ही व्यक्तिरेखा म्हणूनच मला अगदी मनापासून पटली असून ती माझ्यातील सर्वोत्कृष्ट कलागुण बाहेर आणते. वास्तव जीवनात मी कृष्णासारखीच असल्याने मला ही व्यक्तिरेखा साकारताना खूप मजा येत आहे. मी भविष्यवेधी असून बॉलीवूडमध्ये अभिनय करण्याचं माझं स्वप्न आहे.”या मालिकेच्या कथाभागात आता कृष्णा आणि राधे हे आपल्या वैवाहिक जीवनात स्थिर होण्याचा प्रयत्न करताना दिसतील. शुक्ला कुटुंबीय कृष्णापुढे नवनवी आव्हाने उभी करीत असले, तरी त्यांना सामोरे जाताना कृष्णाला राधेही मदत करताना दिसतो.
या मालिकेतील कृष्णाच्या व्यक्तिरेखेसाठी योग्य त्या कलाकाराची निवड करण्यासाठी शंभराहून अधिक इच्छुक उमेदवारांची चाचणी घेण्यात आली होती आणि त्यातून गौरव सरीनची निवड करण्यात आली. या व्यक्तिरेखेसाठी चेहऱ्यावर अगदी निरागस भाव असलेल्या कलाकाराची गरज होती. निर्मात्यांच्या मते या भूमिकेसाठी असलेले सगळे गुण गौरवमध्ये होते. त्यामुळे त्याची निवड करण्यात आली.