Join us

‘कृष्णा चली लंडन’मध्ये मेघा चक्रबोर्तीचा असा झाला मेकओव्हर !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 7:15 AM

या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेन तर काळानुरुप बदलायला हवं ही कलाकांना चांगलीच माहिती त्यामुळे अभावाने मेकओव्हर, लूक बदलणे, स्टाइल स्टेटमेंटमध्ये बदल अशा गोष्टींवर अभिनेत्री मेहनत करतात.

ग्लॅमर अन् फॅशनच्या जगतात वावरत असताना तुमची ‘स्टाइल’च तुमचे व्यक्तिमत्त्व ठरवित असते. कारण यशाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान होत असताना तुम्हाला फॉलो करणारा वर्गही तुमच्या यशाबरोबरच तुमच्या स्टाइलविषयी जाणून असतो. त्यामुळे कलाकारांना नेहमीच ग्मॅमरस दिसण्यासाठी निटनिटके रहावे लागते. आता काळ बदललाय आणि स्पर्धाही वाढलीय. त्यामुळे या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेन तर काळानुरुप बदलायला हवं ही कलाकांना चांगलीच माहिती त्यामुळे अभावाने मेकओव्हर, लूक बदलणे, स्टाइल स्टेटमेंटमध्ये बदल अशा गोष्टींवर अभिनेत्री मेहनत करतात. 

 ‘कृष्णा चली लंडन’च्या कथानकाचा काळ आता पाच वर्षांनी पुढे नेण्यात येणार असल्यामुळे मालिकेच्या कथानकाला अनेक कलाटण्या मिळाल्याचे प्रेक्षकांना आगामी भागांत पाहायला मिळेल. कृष्णाने आपला भूतकाळ मागे टाकून ‘डॉ. कृष्णा’ म्हणून आपल्या जीवनाला नव्याने प्रारंभ केला असून त्यामुळे तिचा कायापालट प्रेक्षकांना नक्कीच अचंबित करून टाकेल.

आता नव्या रूपातील कृष्णा साकार करण्याच्या कल्पनेने उत्साहित झालेली अभिनेत्री मेघा चक्रबोर्ती म्हणाली, “नेहमी साडी किंवा सलवार कमीज अशा पारंपरिक भारतीय वेशात दिसणारी कृष्णा आता एका अगदी नव्या रूपात दिसणार आहे. आता ती शर्ट, जॅकेट, पॅन्ट आणि उंच टाचांच्या चपला घालून पूर्णपणे आधुनिक वेशभूषेत दिसेल. ही नव्या रूपातील कृष्णा अधिक आत्मविश्वासू आणि बंडखोर आहे, असे नव्हे, तर स्वत:चे रुग्णालय चालविणारी ती एक प्रस्थापित डॉक्टर आहे. 

आजवर सर्व समस्या आणि अडचणींना तोंड देऊन त्यातून बाहेर आलेल्या आणि एक नामांकित डॉक्टर म्हणून आपल्या जीवनाचा नव्याने प्रारंभ करणार्‍्या कृष्णाला नव्या वेशात दाखविणे आवश्यक होते. कृष्णाच्या जीवनातील या नव्या टप्प्याला साकार करण्यास मी आतुर झाले आहे. प्रेक्षकांना आता कृष्णा एका नव्या रूपात दिसेल. प्रेक्षकांना माझं हे  नवं रूप पाहणं पसंत पडेल, अशी मी आशा करते.” अपार मेहनत आणि भरीव अभिनयाद्वारे मेघा चक्रबोर्तीने ‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’मधील कृष्णाचा हा कायापालट अतिशय सहजतेने साकार केला आहे.