Join us

'तू ट्रॉफी जिंकली नसलीस तरी...' अभिनेत्री मेघा धाडेची शिवसाठी खास पोस्ट, चाहत्यांच्या कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 12:01 IST

अभिनेत्री मेघा धाडे हिने कायमच आपल्या मित्राला म्हणजेच शिव ठाकरेला पाठिंबा दिला आहे.

'बिग बॉस १६' (Big Boss 16) चा ग्रॅंड फिनाले काल उत्साहात पार पडला. शिव ठाकरेने (Shiv Thackeray) 'बिग बॉस मराठी'चे विजेतेपद पटकावल्यानंतर हिंदी बिग बॉसही गाजवले. त्याच्या एकंदर मराठमोळ्या वागण्याबोलण्यातून त्याने घरातील सदस्यांचे आणि सलमान खानचेही मन जिंकले. कधी प्रेमळ तर कधी कठोर भूमिका घेत त्याने उत्तम खेळी केली. शिव बिग बॉसचा रनर अप ठरला. शिवसाठी त्याची खास मैत्रिण आणि मराठी बिग बॉस १ ची विजेती मेघा धाडेने (Megha Dhade) पोस्ट लिहिली आहे.

अभिनेत्री मेघा धाडे हिने कायमच आपल्या मित्राला म्हणजेच शिव ठाकरेला पाठिंबा दिला आहे. शिव साठी व्होट करा म्हणून तिने अनेकदा चाहत्यांना विनंती केली. काल बिग बॉसच्या फिनाले मध्ये शिवने अंतिम २ पर्यंत मजल मारली मात्र अखेर एमसी स्टॅन (MC Stan) विजेता ठरला. शिवला ट्रॉफी जिंकता आली नाही मात्र त्याने चाहत्यांचे मन नक्कीच जिंकले आहे. शिवसाठी मेघाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. ती लिहिते, 'तू ट्रॉफी जरी जिंकली नसली तरी लाखो चाहत्यांचे मन जिंकले आहेस. खूप खूप अभिनंदन! तुझा नेहमीच अभिमान वाटतो.' #onceawinneralwaysawinner

मेघाच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. शिवच खरा विजेता आहे असं म्हणत चाहते भावूक झाले आहेत. तर अनेक जण शिव विजेता न झाल्याने नाराजही झाले आहेत. चाहत्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात खंत व्यक्त केली आहे. शिवने मात्र कोणताही राग बाळगता चाहत्यांचे आभार मानलेत. तसंच त्याने गळाभेट घेत एमसी स्टॅनचेही अभिनंदन केले आहे. 

दरम्यान बिग बॉसमुळे शिव ठाकरेचे मात्र नशीबच उजळले आहे. शिवला रोहित शेट्टीच्या 'खतरो के खिलाडी' या शोची ऑफर आली आहे. तसेच त्याला सलमान खाननेही आगामी चित्रपटात एका भूमिकेसाठी विचारल्याची चर्चा आहे.अमरावतीच्या अतिशय साध्या कुटुंबातून आलेल्या मराठमोळ्या शिवने त्याच्या मेहनतीने आणि जिद्दीने यश मिळवले आहे. तमाम मराठी प्रेक्षकांना शिव ठाकरेचा कायम अभिमान वाटत राहिल हे नक्की.

टॅग्स :बिग बॉसमेघा धाडेशीव ठाकरेइन्स्टाग्रामसोशल मीडिया