मेलिसा पैस म्हणते, माझ्यातील खऱ्या कलागुणा अश्विनी धीर यांनी घेरले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 4:11 AM
राजकीय परिस्थितीवरील विडंबनात्मक भाष्य करण्याऱ्या ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या मालिकेत मलईची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री मेलिसा पैस ...
राजकीय परिस्थितीवरील विडंबनात्मक भाष्य करण्याऱ्या ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या मालिकेत मलईची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री मेलिसा पैस हिच्या अभिनयावर प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मलई ही एक स्वच्छंदी, उत्साही, बडबडी आणि जीवनावर प्रेम करणारी तरुण मुलगी असून ती मालिकेतील प्रमुख व्यक्तिरेखा चैतुलाल (राजीव निगम) या भ्रष्ट मुख्यमंत्र्याची मेहुणी आहे. पडद्यावर मलईची ही व्यक्तिरेखा ज्या निर्दोष आणि सहजसुंदर पध्दतीने उभी केली गेली आहे, त्याचे सारे श्रेय मेलिसा दिग्दर्शक अश्विनी धीर यांना देते.मेलिसाने पूर्वीही अश्विनी धीर यांच्याबरोबर काम केले असून आपल्या उत्तम अभिनयाबद्दल ती त्यांचे आभार मानते. ती म्हणाली, “माझ्यातील अस्सल अभिनयगुणांना बाहेर काढणारे अश्विनी धीर हेच एक दिग्दर्शक आहेत. ते तुम्हाला एखादा प्रसंग समजावून सांगतात आणि तो कसा उभा करायचा, हे तुमच्यावरच सोपवितात. मलईची व्यक्तिरेखा साकारताना तिची हिंदी बोली ही माझ्यापुढची मोठी अडचण होती, पण अश्विनीजी यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला आणि मी या भूमिकेला योग्य तो न्याय देईन, याची त्यांना खात्री होती.”आपल्या भूमिकेला यापुढेही प्रेक्षकांचा असाच सकारात्मक प्रतिसाद मिळत राहील, अशी तिला आशा वाटते. आपल्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करतानाच सामान्य माणसाचे प्रबोधनही करील, अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली.अभिनेत्री मेलिसा पैस ही आनंदी स्वभावाची असून तिला भोजपुरी गाण्यांच्या तालावर नाचण्याची आवड आहे. यापूर्वी काही हिंदी टीव्ही मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या असल्या, तरी तिला या मालिकेची भोजपुरी ढंगाची भाषा बोलणे कठीण जात होते. मेलिसा मुळात गोव्यातील कॅथलिक ख्रिस्ती असले, तरी मी बरीच वर्षं मुंबईत राहिले आहे आणि अनेक हिंदी मालिकांमध्येही भूमिका रंगविल्या आहेत. जेव्हा हिंदी मालिकांमध्ये प्रथम भूमिका रंगविण्यास तिने सुरुवात केली, तेव्हा तिला हिंदी बोलणंही अवघड जात होतं. आता हर शाख पे उल्लू बैठा है’या मालिकेत मलाईच्या भूमिकेत भोजपुरी ढंगाची हिंदी बोलणार आहे.