सीआयडी मालिकेच्या टीममधील या सदस्याचे झाले निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 6:32 AM
सीआयडी ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील दया, अभिजीत, एसीपी प्रद्युमन, फॅड्रिक्स यांसारख्या व्यक्तिरेखा ...
सीआयडी ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील दया, अभिजीत, एसीपी प्रद्युमन, फॅड्रिक्स यांसारख्या व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांच्या प्रचंड लाडक्या बनल्या आहेत. या मालिकेचे निर्माते बी. पी. सिंग असून या व्यक्तीने या मालिकेला यश मिळवून देण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. बी. पी. सिंग यांचा मोठा मुलगा सलील सिंग हा दिग्दर्शक असून त्याने सीआयडीच्या अनेक भागांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच त्याने सीआयडीचे काही भाग लिहिले देखील आहेत. तो सध्या सावधान इंडिया या कार्यक्रमाचे चित्रीकरण करत आहे. सीआयडीच्या टीमला आणि विशेषतः बी.पी.सिंग यांना नुकताच एक मोठा धक्का बसला आहे. सलीलचे नुकतेच सावधान इंडियाच्या सेटवर निधन झाले आहे. सावधान इंडिया या कार्यक्रमाचे सलील दिग्दर्शन करतो. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन करत असताना त्याला नुकताच हृदयविकाराचा झटका आला. कार्यक्रमाच्या टीमने सलीलला लगेचच मिरा रोड मधील ऑर्चिड रुग्णायलात नेले. पण रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचे निधन झाले होते. सलील हा बी.पी.सिंग यांचा मोठा मुलगा आहे. सेटवर असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सलीलला सेटवर कोणत्याच प्रकारचा त्रास होत नव्हता. तो एकदम व्यवस्थित होता. तो नेहमी प्रमाणेच सावधान इंडियाचे चित्रीकरण करत होता. त्याची पत्नी नेहमीच त्याच्या चित्रीकरणाला उपस्थित असते. त्याच प्रमाणे त्या दिवशी देखील त्याची पत्नी सेटवरच होती. चित्रीकरणातून सलीलने सगळ्यांना काही वेळाचा ब्रेक दिला होता आणि तो बाथरूमला गेला होता. पण खूप वेळ झाला तरी तो बाथरूमधून बाहेर आला नाही. त्यामुळे त्याला काही झाले का याचे सगळ्यांना टेन्शन आले होते. त्यामुळे काही जणांनी बाथरूममध्ये जाऊन पाहिले तर सलील बाथरूममध्ये कोसळलेला होता. त्याची ही अवस्था पाहून त्याला लगेचच जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे रूग्णालयात येण्यापूर्वी निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विशेष म्हणजे बी.पी. सिंग सावधान इंडियाच्या सेटपासून जवळच सीआयडीचे चित्रीकरण करत होते. Also Read : सीआयडी या मालिकेतील दयाला एका दिवसाच्या चित्रीकरणासाठी मिळते इतकी मोठी रक्कम