Join us

मेरे साई मालिकेतील सिद्धांत कर्णिक पडला आहे मुंबई लोकलच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2018 11:54 AM

सिद्धांत कर्णिक वांद्रे येथे राहात असून 'मेरे साई' या मालिकेचा सेटवर हा नायगाव येथे आहे. मालिकेच्या सेटवर जाण्यासाठी  सिद्धांत लोकल ट्रेनने प्रवास करतो. हा प्रवास सिद्धांत खूप एन्जॉय करत असल्याचे तो सांगतो.

मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल ट्रेन सर्वांना आपआपल्या मुक्कामावर वेळेत पोहोचवण्यासाठी ओळखली जाते. त्यामुळेच लोकांना कुठेही लवकर पोहोचायचे असेल तर ते ट्रेनचा आधार घेतात. वेळेत पोहोचण्यासाठी लोकल ट्रेनला आपला आधार मानणाऱ्यांमध्ये केवळ सर्वसामान्य लोकच नाहीत तर टीव्ही कलाकार देखील आहेत. सोनी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या 'मेरे साई' या मालिकेतील गणपतराव यांची भूमिका साकारणारा सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत कार्णिक देखील आपल्या घरून मालिकेच्या सेटपर्यंत गाडीने न जाता ट्रेनने जाणे पसंत करतो.

सिद्धांत कर्णिक वांद्रे येथे राहात असून 'मेरे साई' या मालिकेचा सेटवर हा नायगाव येथे आहे. मालिकेच्या सेटवर जाण्यासाठी  सिद्धांत लोकल ट्रेनने प्रवास करतो. हा प्रवास सिद्धांत खूप एन्जॉय करत असल्याचे तो सांगतो आणि तो ट्रेनने प्रवास करत असल्याने शुटींगच्या ठिकाणी देखील वेळेवर पोहोचतो.

‘मेरे साईं’ या मालिकेत सिद्धांत गणपतराव ही भूमिका साकारत आहे. गणपतराव व्यवसायाने नाट्यकलाकार असून नाटक कंपनीचा मालक असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याला आपल्या कामाबाबत प्रचंड गर्व आहे आणि साईबाबा त्यांचे गर्वहरण करून त्याला एक चांगला माणूस बनवतात असे मालिकेत दाखवण्यात येणार आहे. 

वांद्रे ते नायगाव या दरम्यान प्रचंड ट्रफिक लागत असल्याने हा प्रवास ट्रेनने करणे अधिक सोयीस्कर असल्याचे सिद्धांतचे म्हणणे आहे. आपल्या या ट्रेन प्रवासाबाबत सिद्धांत सांगतो की, "मुंबईमधील वांद्रे म्हणजेच माझ्या घरापासून 'मेरे साई' च्या सेटपर्यंत म्हणजेच नायगावला कारने पोहोचायला जवळपास दोन ते तीन तास लागतात परंतु, जेव्हा मी ट्रेनने नायगावला जातो तेव्हा प्रवासासाठी कमी वेळ लागतो आणि ट्राफिकच्या जंजाळातून देखील जीव वाचतो. ट्रेनच्या प्रवासाचा आनंद काही वेगळाच आहे, एकतर मस्त हवा असते... आरामशीर वर्तमानपत्र वाचत मी प्रवास करतो आणि वेळेत सेटवर पोहोचतो. खरोखरच लोकल ट्रेन म्हणजे लाईफ लाईन आहे. या ट्रेनच्या प्रवासात बऱ्याचदा फॅन्स देखील भेटतात आणि त्यांना भेटून खूप आनंद होतो. 

 

टॅग्स :मेरे साई मालिका