Join us

अबीर सूफीला 'या' भूमिकेने दिली बहूमुल्य शिकवण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 6:30 AM

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'मेरे साई' या तुमच्या आवडत्या मालिकेतील आगामी कथानकात कृष्ण कुमार यांची सत्य कथा सादर होणार आहे.

ठळक मुद्देही कथा सत्य घटनेवर आधारित आहे

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई या तुमच्या आवडत्या मालिकेतील आगामी कथानकात कृष्ण कुमार यांची सत्य कथा सादर होणार आहे, जे अत्यंत श्रीमंत असतात पण नेहमी चिंतामग्न आणि अस्वस्थ असतात, आणि त्यामुळे त्यांना निद्रनाशाचा रोग जडलेला असतो. झोपेच्या अभावी त्यांना खूप त्रास असतो.

या परिस्थितीशी सामना करून ते थकून जातात व शेवटी साई बाबांकडे जाऊन त्यांची मदत मागतात. साई बाबा त्याची समस्या सोडवतात. ते त्याला मुठीतल्या वाळूचे उदाहरण देऊन याची जाणीव करून देतात की, ते जितके ती वाळू घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतील, तितकीच ती त्यांच्या मुठीतून निसटून जाईल. त्यानंतर बाबा अंगाई गीत गाऊन त्यांना शांत झोपवतात. बाबा त्यांना एक काम देतात आणि सांगतात की आपल्या जमिनीतील एक तुकडा एखाद्या गरजू माणसाला द्या. 

आपल्या भूमिकेबाबत अबीर सूफी म्हणाला, “साई बाबांच्या ठायी असलेल्या गावकर्‍यांच्या अतूट विश्वासामुळे साई नेहमी त्यांच्या समस्या सोडवायला मदत करायचे हे पाहताना अद्भुत वाटते. या मालिकेतून मी खूप बहुमोल धडे घेतले आहेत आणि सर्व प्रेक्षकांनी ही मानवी मूल्ये आपल्या वैयक्तिक जीवनात रुजवावीत अशी माझी इच्छा आहे.” ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे. अशा लहान आणि साध्या गोष्टींच्या माध्यमातून ही मालिका आपल्याला जीवनाचे असंख्य धडे शिकवून जाते, ज्यांच्या अंगिकारामुळे आपले जीवन अधिक सार्थ होऊ शकते. गरजूंना मदत करण्याचे मूल्य या कथेतून शिकवले आहे.

टॅग्स :मेरे साई मालिका