Join us

जागतिक वन्यजीव दिनाबद्दल सुयशने दिला संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2016 6:57 AM

आजच्या धावत्या युगात निसर्गाची काळजी घेणाºयांची संख्यादेखील कमी होत चालली आहे. तसेच प्राणी, पक्षी यांसारख्या वन्यजीवांचा विचारदेखील फारसे लोक ...

आजच्या धावत्या युगात निसर्गाची काळजी घेणाºयांची संख्यादेखील कमी होत चालली आहे. तसेच प्राणी, पक्षी यांसारख्या वन्यजीवांचा विचारदेखील फारसे लोक करीत नाही. पण आज वन्यजीव दिनाबद्दल का रे हा दुरावा या मालिकेतून घराघरात पोहोचणारा आदित्य म्हणजेच सुयश टिळक याने निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा,प्राणी,पक्ष्यांची काळजी घ्या असा संदेश सोशलमिडीयाच्या माध्यमातून दिला आहे.तसेच उन्हाळा आला आहे, तर पर्यावरणाचा विचार करा. अंघोळीचे पाणी एक टबमध्ये साठवून बाल्कनीतल्या झाडांना दया त्याचबरोबर पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी बाल्कनीत पाणी ठेवा असे ही उपाय सुयशने सुचविला आहे. आणि आपल्या रसिक मायबाप प्रेक्षकांना जागतिक वन्यजीवाच्या शुभेच्छा दिल्या आहे.