पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओमकारनाथ शास्त्री.. एक सामान्य व्यक्ती.. सामान्य असूनही मनःशांती आणि ध्यानधारणा करुन त्यानं सुपरपॉवर मिळवली... शत्रूचा तो कर्दनकाळ ठरला.. तो म्हणजे सा-यांचा लाडका शक्तीमान.. छोट्या पडद्यावर 1990 च्या दशकात छोट्या पडद्यावर शक्तीमान ही मालिका आली आणि बघता बघता या मालिकेनं बच्चेकंपनीच्या मनात अढळ स्थान मिळवलं.. मुकेश खन्ना यांनी साकारलेली शक्तीमान ही भूमिका आजही प्रत्येकाच्या स्मरणात आहे.. शक्तीमानची पुन्हा एकदा आठवण येण्याची कारण म्हणजे सा-यांचा लाडका शक्तीमान पुन्हा एकदा परत येतोय.. याचनिमित्त शक्तीमान मुकेश खन्ना यांनी सीएनएक्ससोबत साधलेला हा खास संवाद* शक्तीमान पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येणार असल्याचं समजतंय. किती एक्साईटेड आहात ?शक्तीमान पुन्हा एकदा बच्चेकंपनीच्या भेटीला येणार आहे हे खरं आहे. शक्तीमान सुरु झाल्यापासूनच मला बच्चेकंपनीचं खूप प्रेम मिळालं. या मालिकेनंतर जिथे जिथे मी गेलो तिथे तिथे चिमुकले माझ्याभोवती गराडा घालतात. माझ्यासोबत फोटो आणि ऑटोग्राफ घेण्यासाठी त्यांची धडपड असते. आजही मला ते शक्तीमान म्हणूनच ओळखतात. हे सारं पाहून पुन्हा एकदा शक्तीमान घेऊन येण्याचा विचार पुढे आला.* 'शक्तीमान' पुन्हा येणार म्हटल्यावर त्यासाठी काय खास तयारी केली आहे ?शक्तीमान पुन्हा येणार यासाठी काही खास अशी तयारी केलेली नाही. मात्र व्यायाम आणि इतर गोष्टी नित्यनियमाने सुरुच आहेत. बरेच जण माझ्या वयामुळं ही भूमिका कशी साकारणार असा प्रश्न विचारतील.. पण माझ्या मते कोणतीही भूमिका साकारण्यासाठी वय हे महत्त्वाचं नसतं. तसंच वजन वाढवणं किंवा कमी करणं यावरही माझा फारसा विश्वास नाही.. मात्र या भूमिकेसाठी जे जे करावे लागेल ते ते करण्याची तयारी आहे.
'शक्तीमान' परततोय !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2016 10:52 AM