Mika Singh First Date: बॉलिवूडचा सिंगर मिका सिंग (Mika Singh ) याचं स्वयंवर पार पडलं आणि सरतेशेवटी मिकानं त्याची ‘दुल्हनियां’ निवडली. अनेक वर्षांपासूनची मैत्रिण आकांक्षा पुरी (Akanksha Puri) हिच्याच गळ्यात मिकाने ‘वरमाला’ घातली. स्वयंवरात देशभरातील वेगवेगळ्या भागातून अनेक सुंदर सुंदर तरूणी आल्या. पण मिकाला इम्प्रेस केलं ते आकांक्षाने. सर्व मुलींना रिजेक्ट करत मिकाने आकांक्षाला निवडलं. स्वयंवर संपल्यानंतर मिका पहिल्यांदा त्याची ‘दुल्हनिया’ आकांक्षासोबत दिसला. या नव्या जोडप्याची चर्चा झाली नसेल तर नवल.
‘स्वयंवर- मिका दी वोटी’च्या (Swayamvar- Mika Di Vohti ) फिनालेमध्ये मिकाने आकांक्षा पुरीची निवड केली. अर्थात शोमध्ये लग्न करणं त्याने टाळलं. लग्नाआधी मला आकांक्षाला आणखी जाणून घेणं आवडेल. त्यानंतरच आम्ही लग्न करू, असं मिका म्हणाला. यानंतर काल रात्री मिका व आकांक्षा एका रेस्टॉरंटबाहेर दिसले. पहिल्या डेटवर गेलेल्या या जोडप्याची एक छोटीशी क्लिप सध्या व्हायरल होतेय.
मिका व आकांक्षा दोघंही एकमेकांच्या हात हातात घेऊन पहिल्यांदा पब्लिकली दिसले. यावेळी दोघांनीही स्टायलिश अंदाजात कॅमेºयांना पोझ दिली. यावेळी आकांक्षा पिंक बॅकलेस शॉर्ट ड्रेसमध्ये सुपर स्टायलिश दिसत होती तर मिकाही सूटाबुटात शोभून दिसत होता.आकांक्षा व मिकाची जोडी चाहत्यांना आवडली. अर्थात काहींनी या जोडीला ट्रोलही केलं.काही चाहत्यांना मिका व आकांक्षाची जोडी इतकी आवडली की त्यांनी #Mikasha हा हॅशटॅग बनवला. पण काही लोकांनी ‘मिकाशा’ला ट्रोलही केलं. आता ट्रोल का केलं? तर ही जोडी अनेकांना मिस-मॅच वाटली.
आकांक्षा-मिका झालेत ट्रोल
आकांक्षा व मिका दोघंही 10-12 वर्षांपासून मित्र आहेत. एकेकाळी दोघांच्या अफेअरच्या चर्चाही होत्या. अशात आकांक्षाने अचानक मिकाच्या स्वयंवरमध्ये एन्ट्री करणं आणि शोची विनर बनणं अनेकांच्या पचनी पडलं नाही. हे सगळं प्री-प्लान्ड असल्याचं चाहत्यांचं मत आहे. हा शो स्क्रिप्टेड होता, असा आरोपही काही सोशल मीडिया युजर्सनी केला आहे. मिका व आकांक्षा दोघांमध्येही कुठलीही केमिस्ट्री नाही. हे दोघं कपल आहेत, असं कुठेही जाणवत नाही, अशा प्रतिक्रियाही युजर्सनी दिल्या. हे लग्न करणार नाहीत, लिहून घ्या, असं एका युजरने दाव्यानिशी म्हटलं आहे.